ब्रेकिंगमहाराष्ट्र
उमेदवार धिरज पाटलांची पत्रकार परिषद निवडूक आयोगाच्या कचाच्यात – निवडणूक निर्णय अधिकारी डव्हळे यांची कारवाई
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

उमेदवार धिरज पाटलांची पत्रकार परिषद निवडूक आयोगाच्या कचाच्यात – निवडणूक निर्णय अधिकारी डव्हळे यांची कारवाई
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण? असा प्रश्न मतदारांमध्ये निर्माण होईल अशी स्थिती निर्माण करण्यात आलेली आहे. या संदर्भात, भूमिका स्पष्ट करण्यासाठी धीरज पाटलांनी दि १९ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता तुळजापूर मध्ये पत्रकार परिषद घेतली. अर्थात ही पत्रकार परिषद नियमबाह्य, राज्य निवडणूक आयोगाच्या नियमाला डावलणारी ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी तात्काळ खुलासा करण्याची सूचना करण्यात याव्या नोटीस बजावली