न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

राजाने, काय दिवे लावलेत ? उत्सुकता !!!भावी आमदार शनिवार पर्यंत ऑक्सिजनवर !

ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

राजाने, काय दिवे लावलेत ? उत्सुकता !!!भावी आमदार शनिवार पर्यंत ऑक्सिजनवर

ज्ञानेश्वर गवळी,तुळजापूर

लोकशाहीचा उत्सव मोठ्या थाटात,20 नोव्हेंबरला पार पडला. मतदार राजाने,कोणाच्या पारड्यात दानरूपी मतदान टाकलेय..या विषयी गावागावात चर्चा आणि निकालाची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. मतदानानंतर आत्ता भावी आमदार शनिवार पर्यंत ऑक्सिजनवर असल्याचे मतदानानंतर दिसते आहे.धाराशिव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत झाली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी सह अन्य पक्षाचे उमेदवार आमदारकीसाठी आपले नशीब आजमावत आहेत. 20 नोव्हेंबरला सकाळी मतदानाला सुरुवात झाली. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात नागरिकांनी गर्दी करून मतदान केले. धाराशिव शहर तालुका आणि जिल्ह्यातील मतदान केंद्रावर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू होता. प्रशासनाने देखील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ग्रह भेट टपाली मतदान राबवले होते. 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान उमरगा मतदार संघामध्ये 85 वर्षावरील 582 तर 187 दिव्यांग अशा 769 मतदारांनी मतदान केले. परंडा विधानसभा मतदारसंघांमध्ये 85 वर्षावरील 695 तर 127 दिव्यांग अशा एकूण 822 मतदारांनी मतदान केले. धाराशिव तालुक्यामध्ये 85 वर्षावरील 457 तर 69 दिव्यांग आशा एकूण 516 मतदारांनी मतदान केले.20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 240 उमरगा 57.88%,241 तुळजापूर 62.26% 242 उस्मानाबाद धाराशिव 56.22% तर 243 परांडा विधानसभा मतदारसंघांमध्ये 57.70% मतदान झाल्याचे आकडेवारी जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली. या चारही मतदारसंघांमध्ये पाच वाजेपर्यंत 58.59% मतदान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

पाच वाजेपर्यंत 240 उमरगा 57.88%,241 तुळजापूर 62.26% 242 उस्मानाबाद धाराशिव 56.22% तर 243 परांडा विधानसभा मतदारसंघांमध्ये 57.70% मतदान झाल्याचे आकडेवारी जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली. या चारही मतदारसंघांमध्ये पाच वाजेपर्यंत 58.59% मतदान झाल्याचे सांगण्यात आले आहे.मतदानानंतर आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. मतदार राजाने काय दिवे लावले आहेत हे शनिवारी स्पष्ट होणार आहे. गावागावातील कार्यकर्त्यांमधून, आपल्यात उमेदवाराचा मतदान टक्का वाढवा यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत होते. मतदान होण्यापूर्वी आणि मतदानानंतर मतदार राजा स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांना, आपलेच पारडे कसे जड आहे हे पटवून देत असलेले दिसून आले.जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीची निवडणूक झाली असून,उमरगा- लोहारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले आणि महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. परंडा मतदारसंघांमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राहुल मोटे यांच्यात, धाराशिव क्रम मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार,विद्यमान आमदार कैलास पाटील आणि महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्यात काट्याची टक्कर आहे.तुळजापूर मतदारसंघांमध्ये, महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण ? याबाबत मतदान तारखेपर्यंत घोळ कायम राहिला. तर महायुतीचे उमेदवार, भाजपाचे विद्यमान आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी आपल्या हक्काच्या 72 गावासह, तुळजापूर तालुक्यातील 104 गावांमध्ये शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा आणि मतदारांना आपलेसे करण्यात यश मिळवले होते. याच मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील, काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील यांच्यावर कडून टीका केली.प्रत्यक्षात मतदार राजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे याकरिता आता शनिवार पर्यंत उत्सुकता लागून राहिले असून भावी आमदार ऑक्सिजनवर असल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे.

✍️ ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे