
—————————–
खुदावाडी ( सतिश राठोड ) :- अक्कलकोट येथील लीड स्कूल सीबीएससी इंटरनॅशनल शाळेतील राठोड या गुणवंत विद्यार्थ्यांचा खुदावाडी ता तुळजापूर येथील भारतीय लष्कराचे सैवानिवृत्त मेजर शिवाजी कबाडे यानी रोख स्वरूपात पारितोषिक देऊन सन्मान केला .
शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावं यासाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अक्कलकोट येथील लीड स्कूल या इंग्रजी माध्यम शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
सेवानिवृत्त मेजर कबाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी शूर भारतीय सैनिक आणि महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची माहिती शालेय विद्यार्थाना दिली तसेच विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लीड स्कूलचे प्राचार्य कुमार माणतू , मॅनेजर संजय आळगी यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मेजर कबाडे हे होते .यावेळी इयत्ता सातवी व आठवीचे विद्यार्थी स्वप्निल राठोड ,आर्यन पवार , जयेद बागवान ,अरहान नाईकवाडी यांनी स्वतंत्र वीर भगतसिंग या विषयावर नाटिका सादर केली या नाटकेमध्ये स्वप्निल राठोड यांनी स्वातंत्र वीर भगतसिंग यांची भूमिका सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली . त्यानी या नाटिकेत आदर्शवत कामगिरी बजावल्याबद्दल माजी सैनिक सैनिक कबाडे यांनी पारितोषिक देऊन राठोड या शालेय विद्यार्थाचा सन्मान केला.
सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्कलकोट सह शिक्षक दत्तात्रय पोतदार , प्राची जोजन मॅडम , विजयलक्ष्मी कोरशेट्टी , एडमिन मुबीन तांबोळी यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले .