लोहारा येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी हरी लोखंडे,उपाध्यक्षपदी अमीर हमजा खुटेपड
Post-गणेश खबोले

लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हरी लोखंडे यांची तर उपाध्यक्ष पदी अमीर हमजा खुटेपड यांची मतदान आणि चिट्टी च्या आधारे निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदासाठी हरी लोखंडे, बाळासाहेब पाटील,ज्योती स्वामी, व्यकटेश पोतदार आणि सुनीता लोहार हे इच्छुक होते. चिट्टी तुन मतदान प्रकिया पार पडली असता हरी लोखंडे ४,बाळासाहेब पाटील ४,ज्योती स्वामी २,सुनीता लोहार २ आणि व्यकटेश पोतदार १ असे मतदान झाले. हरी लोखंडे आणि बाळासाहेब पाटील यांच्यात चिट्टी काडून हरी यांचे नाव आल्याने त्यांना अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
दि.१३ रोजी शालेय व्यवस्थापन समिती निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यानुसार सकाळी १० वाजता शाळेच्या प्रांगणात निवडी बद्दल सर्व नियम याची माहिती उपस्थित पालक वर्गांना देण्यात आले.शालेय व्यवस्थापन समिती च्या १३ सदस्य निवडीचा आरक्षण दव्हरे सोडती चा कार्यक्रम जाहीर झाला त्यानुसार इयत्ता १ ते ७ पर्यंत च्या वर्गातून सदस्य निवडी पार पडल्या.
नवनिर्वाचित सदस्य म्हणून जसवंतसिंह बायस,बाळासाहेब पाटील,ज्योती श्रीशैल्य स्वामी,सुनीता लोहार,तात्याराव कांबळे,व्यंकटेश पोतदार,साधना भुजबळ,सोनाली कांबळे,सना फकीर,अश्विनी अपसिंगेकर,गीता गरड यांची निवड करण्यात आली.त्यांचा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मुख्याध्यापक दत्ता फावडे यांनी सत्कार केला.यावेळी पालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.