धारूर येथे या वर्षातील आठव्यादां ग्रांमस्वच्छतेत ९० वर्षाच्या हिराबाई गायकवाड याचांही हीरीरीने सहभाग

धारूर येथे या वर्षातील आठव्यादां ग्रांमस्वच्छतेत ९० वर्षाच्या हिराबाई गायकवाड याचांही हीरीरीने सहभाग
धारूर /न्यूज सिक्सर
धाराशिव तालुक्यातील धारूर येथे या वर्षामधील सलग आठव्यादां ग्रांमस्वच्छता करण्यात आली. दि.१८ रविवार रोजी मराठवाडा जन विकास संघाचे संस्थापक: अध्यक्ष वृक्षमित्र राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अरुण (बापू) पवार यांच्या प्रेरणेने व लोकनियुक्त सरपंच बालाजी (काका)पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले सकाळी ठीक ७ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय येथून सुरुवात करण्यात आली मेन रोड धारूर भीमनगर परिसर तसेच मंदिर परिसर तसेच आज स्वच्छता अभियानाचा आठवा टप्पा यामध्ये धारूर गावातील ९० वर्षांच्या हिराबाई गायकवाड या आजीने देखील सहभाग घेऊन धारूर गाव स्वच्छ आणि आदर्श गाव बनवणे साठी प्रयत्न करणार असे सांगितले. याच प्रेरणे गावातील नवयुवकांनी प्रयत्न करून धारूर गाव स्वच्छ आणि सुंदर बनऊ अशी शपथ घेऊन सांगितले की ग्रामस्वच्छतेमधे सहभागी होऊन स्वच्छता अभियानामध्ये आपला विशेष सहभाग म्हणून गावातील स्वच्छता कशी करता येईल याची आखणी केली. मागील दहा वर्षांपासून गावात व धारूर ते तुळजापूर बायपास पर्यंत च्या हजारो झाडानां दररोज टँकरद्वारे पाणी देणे हे कामे नित्यनियमाने चालु आहेत. धारूर गावातील लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. या वेळी संस्थापक अध्यक्ष वृक्षमीत्र अरूण पवार म्हणाले की मराठवाडा जनविकास संघ धारूर व पिंपरी चिंचवड पुणे ने दर वर्षाप्रमाणे या ही वर्षी देहु -आळंदीहुन येणा-या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी, व जगदगुरू तुकाराम महाराजांच्या पालखीत पीण्याच्या पाण्याचे चार टँकर पंढरपूर पर्यंत सेवा देण्यासाठी मोठ्या भक्ती भावाने पूजाविधी करून पाठवण्यात आले.तसेच पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.तसेच मराठवाडा (हैद्राबाद)मुक्ती संग्राम अमृतवर्षानिमीत्य धाराशिव जिल्ह्यात सात कार्यक्रमा पैकी ५जुलै २०२३ रोजी तुळजापूर तालुक्यातील अपसिंगां येथे थोर स्वतंत्र सैनीक हुतात्मा श्रीधर वर्तक जन्मशताब्दीनिमित्त ७५ वडाची झाडे लाऊन मोठ्या दिमाखात कार्यक्रम करणार आहोच असे सांगीतले. या वेळी लोकनियुक्त सरपंच बालाजी (काका) पवार समाजसेवक रत्नाकर खांडेकर सर विशाल पवार अभिजीत कामटे बालाजी गुरव सोमनाथ कोरे जयसिंग पाटील श्रीराम कदम महेश गुरव बाळासाहेब कोरे ग्रा.सदस्य बापूराव गायकवाड ,तुकाराम गायकवाड ,रमेश गायकवाड ,हिराचंद गायकवाड रामहरी गायकवाड,चिकू गायकवाड, मनीषा गायकवाड, जयश्री गायकवाड याबरोबर गावातील युवक वर्गाने मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला.