ब्रेकिंग
धाराशिव येथे धनगर समाजातर्फे फडणवीस यांचा सत्कार

धाराशिव येथे धनगर समाजातर्फे फडणवीस यांचा सत्कार
धाराशिव /न्यूज सिक्सर
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती,२२ योजना दिल्याबद्दल धाराशिव येथे धनगर समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला .
उपमुख्यमंत्री श्री . फडणवीस शुक्रवारी दि . १६) धाराशिव जिल्हा दौर्यावर आले होते . धनगर समाजाच्या वतीने धाराशिव येथे
श्री . फडणवीस यांना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते यांच्या हस्ते काठी आणि घोंगडे देवून सत्कार करण्यात आला . यावेळी श्रीकांत तेरकर, श्याम तेरकर, बालाजी तेरकर, संतोषकुमार वतने, सचिन घोडके, पिंटू घोडके , गिरीष पानसरे आदीसह धनगर समाजातील नागरीक व भाजपचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .