न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पोलिस अधिक्षक अतूल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ! तुळजापूर पोलिस ठाण्यात २० ते २५ सेंद्रिय भाजीपाल्याचे स्टॉल लावण्यात आले होते.

पोलिस अधिक्षक अतूल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली !

तुळजापूर पोलिस ठाण्यात २० ते २५ सेंद्रिय भाजीपाल्याचे स्टॉल लावण्यात आले होते.

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

अर्थव्यवस्थेचा कणा म्हणू शेतीकडे पाहीले जाते. मात्र शेतकरी सध्या अडचणीत आहे. निसर्गाचा लहरीपणे, पाऊस वेळेवर न पडणे. वर्षभर शेतात राबून सुद्धा योग्य भाव न मिळणे यामुळे शेतकरी अडचणीत आहे. यातूनच सरकार दरवर्षी हमीभाव जाहीर करते. मात्र, तो भाव अनेकदा फक्त कागदावरच राहतो. शेतकऱ्यांना त्याची माहिती होत नाही.

जागतिक जल दिनानिमित्त दि.२३-०३-२०२३ रोजी सकाळी ०९: ४५ वा.तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक गावामधे शेततळे खोलीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर तुळजापूर पोलिस ठाणे परिसरात १० :३० वाजण्याच्या सुमारास सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र २० ते २५ स्टॉलचे उद्घाटन पोलिस अधिक्षक अतूल कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद , पोलिस उप निरिक्षक विठ्ठल चासकर , रवि शिंदे, क्षिरसागर तसेच पोलिस प्रशासनाची टिम सह शेतकरी २० ते २५ शेतकऱ्यांचे स्टॉलावण्यात आले होते त्या ठिकाणावरूण पोलिस अधिकारी , कर्मचारी,तसेच शहरातील नागरीक, पत्रकार,पुजारी बांवानी भाजीपाल्या सहीत कडधान्य विकत घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे