न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी प्रचंड वाचन करून आपली बौद्धिक कार्यक्षमता तरबेज ठेवावी – प्रा.डॉ.दिपाली  मालखेडे

विद्यार्थ्यांनी प्रचंड वाचन करून आपली बौद्धिक कार्यक्षमता तरबेज ठेवावी – प्रा.डॉ.दिपाली  मालखेडे

सर्वोदय कॉलनीत कुलगुरू स्व. प्रा.डाॅ.दिलीप मालखेडे वाचनालयाचे थाटात उद्घाटन

अमरावती ता. ( प्रतिनिधी )
” मेंदू जितका कार्यरत राहील तितकी त्याची कार्यक्षमता वाढत असते असं बोलल्या जातं. वाचन म्हणजे मेंदूसाठीची कसरत किंवा व्यायाम आहे.वाचनाने मेंदू सतत कार्यरत राहतो आणि अधिक कार्यक्षम होतो म्हणून लहान मुलांमध्ये वाचनाची सवय लागली तर पुढे मोठे होऊन ही मुलं हुशार बनतात,कुलगुरू स्व.दिलीप मालखेडे यांना वाचनाची प्रचंड आवड होती, त्यांच्या जवळ असलेल्या पुस्तकाचे वाचन करून ते टिपणं काढीत त्यामुळे शब्द संपत्तीचे ते धनी होते.विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात प्रचंड वाचन करावे व आपली बौद्धिक कार्यक्षमता तरबेज ठेवावी.’असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका व स्व .दिलीप मालखेडे यांच्या धर्मपत्नी
डॉ.दिपाली दिलीप मालखेडे यांनी काढले.
त्या स्थानिक सर्वोदय कॉलनी, काँग्रेस नगर रोड येथील संत रोहिदास महाराज सांस्कृतिक भवनात आयोजित कुलगुरू स्व.प्रा.डॉ.दिलीप मालखेडे वाचनालयाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी सर्वोदय गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकरराव नासने तर विशेष अतिथी व उदघाटक मिशन आयएएस अकादमीचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे, प्रमुख अतिथी डॉ.राजीव जामठे, दिवंगत कुलगुरूंचे वडील श्री नामदेवराव मालखेडे,आई
सौ.वेणूताई मालखेडे,प्रा.डॉ. संजय खडसे विचारपीठावर उपस्थित होते. तर साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले,इंजि.श्री.
राजन खंडारे,डॉ.विजय तायडे,
प्रा.डॉ.दिनेश रोजतकर , प्रा.निरंजन मकेश्वर,श्री.वासुदेव वानखडे,श्री मनोहर चव्हाण,
श्री अशोक तायडे ,श्री व्यंकटराव खोब्रागडे, श्री गजानन इंगळे ,
श्री रुपराव इंगळे,श्री दिलीप डिवरे इ.मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संत गुरू रोहिदास महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कुलगुरू स्व.प्रा.डॉ. दिलीप मालखेडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलित करून व फित कापून ” कुलगुरू स्व.प्रा.डॉ.दिलीप मालखेडे वाचनालयाचे ” उद्घाटन
मान्यवरांनी केले.
या प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत श्री सुधाकर विरुळकर,श्री रामदास इंगळे,श्री मधुकर बुंदिले , श्री.प्रभाकर सावरकर,सौ.नम्रता खंडारे,सौ.सरस्वतीबाई सावरकर, श्री चंद्रशेखर खंडारे आदींनी पुष्पगुच्छ देऊन केले .
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. दिलीप मालखेडे यांचे जानेवारी महिन्यात दुःखद निधन झाले. ते सर्वोदय कॉलनीतील रहिवासी होते. त्यांची स्मृती चिरंतर राहावी तसेच नव्या पिढीने वाचन संस्कृतीचे जतन करून निरंतरपणे वाचन करीत मोठ मोठी हुद्दे पादाक्रांत करावी या उद्देशाने कॉलनी वासियांनी “कुलगुरू स्व.प्रा.डॉ. दिलीप मालखेडे वाचनालय “सुरू करण्याचे एकमताने ठरविले त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला.कॉलनीतील रहिवासी श्री.प्रभाकर सावरकर व सौ. सरस्वती सावरकर यांनी मोठी पुस्तकाची स्टीलची रॅक वाचनालयास भेट दिली. चिखलदरा येथील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री सुधाकर पानझडे यांनी दहा हजार रुपये तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्काराने सन्मानित समाजभूषण श्री सुधाकर विरुळकर यांनी पाच हजार रुपयांची देणगी वाचनालयास जाहीर केली.प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी दहा हजार रुपयांची पुस्तके तर प्रा.केशव भगवान मालखेडे (बंगलोर)यांनी दहा हजार रुपयांची देणगी वाचनालयास याप्रसंगी जाहीर केली. अभगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी वाचनालयात शंभर पुस्तके देण्याचे जाहीर केले.
अनेकांकडून पुस्तक रूपाने देणगी वाचनालयास प्राप्त झाली आहे.
“स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालय आवश्यक ”
-प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
कुलगुरू स्व.प्रा.डॉ.दिलीप मालखेडे वाचनालयाचे उद्घाटन मिशन आयएसचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले की , ” वाचनालय अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्याची सोय निर्माण झालेली आहे, आजच्या स्पर्धेच्या युगात वाचनालयाचे स्वरूप बदललेले असून डिजिटल ग्रंथालयांची निर्मिती होत आहे.लहान मुलांना अशी सोय ग्रंथालयातून किंवा वाचनालयातून उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना ग्रंथातून चांगले ज्ञान प्राप्त होऊ शकेल.”असे विचार व्यक्त केले.
.”विद्यार्थी हित साधणारे कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे
-प्रा.डॉ.संतोष बनसोड
याप्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डॉ.संतोष बनसोड यांनी ” कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे यांच्या कार्य कर्तुत्वाचा आढावा घेऊन विद्यार्थी हितौशी असलेल्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता अनेक योजना तयार केल्या होत्या, त्याची अंमलबजावणी होत असतानाच काळाने कुलगुरूंना आपल्यातून घेऊन गेल्याचे “ते यावेळी म्हणाले.
“कै.डॉ.दिलीप मालखेडे एक ग्रंथप्रेमी”
– प्रा.श्री.अरुण बुंदेले
” कुलगुरू कै.डॉ.दिलीप मालखेडे ग्रंथप्रेमी होते.वाचनाचा नाद म्हणजे ज्ञानाचा झरा या विचारातूनच त्यांनी अनेक ग्रंथांचे वाचन केले होते म्हणूनच ते उच्च पदावर पोहोचले.कुलगुरूंच्या नावे असलेले हे वाचनालय सर्व स्तरातील विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त ठरेल.” असा आशावाद व्यक्त करून साहित्यिक
प्रा.अरुण बुंदेले यांनी
आपल्या भाषणातून कुलगुरू कै.डॉ.दिलीप मालखेडे यांच्या जीवनावरील स्वरचित गीताचे वाचन केले.वाचनालयासाठी स्वलिखित व इतर पुस्तके भेट दिली व १०० पुस्तके देण्याचा संकल्प केला.
“मन परिवर्तनासाठी वाचन आवश्यक ”
– प्रा.डॉ.संजय खडसे
आपल्या प्रास्ताविक मनोगतातून प्रा.डॉ.संजय खडसे म्हणाले की , ” वाचनाने माणूस प्रगल्भ होतो,मनाचे परिवर्तन होऊन मनातील सर्व जळमटं त्याला दूर करता येतात,माणूस ज्ञानी बनतो.मुलांना लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण झाल्यास तो अभ्यासात हुशार होतो, वाचनातून विद्यार्थी कार्यक्षम बनतो,त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. कुलगुरू स्व. प्रा.डॉ.दिलीप मालखेडे सर पुस्तकांच्या वाचनामुळेच प्रज्ञावंत,ज्ञानवंत झाले होते , लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व मोठ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीचे जतन करावे मा.कुलगुरूंचे नाव चिरंतर टिकून राहावे याकरिता “कुलगुरू स्व.प्रा.डॉ.दिलीप मालखेडे वाचनालय ” निर्माण करण्यात आले .मा.कुलगुरू डॉ.मालखेडे सर यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूंचे लेखन कवी,लेखकांनी करावे,ज्यामुळे शालेय क्रमिक पुस्तकांतील अभ्यासक्रमातून कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे सर यांचे जीवन चरित्र अभ्यासता येईल,”असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकर नासणे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की , ‘”प्रत्येकाने आपले सामाजिक ऋण फेडण्यासाठी पुढे आले पाहिजे.स्व.प्रा.डॉ.दिलीप मालखेडे यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान मोठे आहे. त्यांचे नाव असलेले वाचनालय समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे ‘ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रा.डॉ.संजय खडसे तर आभार जिल्हा परिषदेचे वित्त अधिकारी श्री चंद्रशेखर खंडारे यांनी केले.
कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी श्री.सुधाकर विरुळकर,सौ.कांता नासणे,सौ.अनिता खडसे,
श्री अशोक उर्फ अण्णा तायडे , अर्जुन डाखोरे,अंश काटोले, दिव्यांशू जोगे,सिद्धांत खडसे आदींनी विशेष परिश्रम घेतले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे