बुरुड समाज श्री मेसाई सद्भक्त मंडळाच्या अध्यक्षपदी शिवानंद वडतीले तर सचिव पदी बाळकृष्ण सुरवसे यांची निवड

बुरुड समाज श्री मेसाई सद्भक्त मंडळाच्या अध्यक्षपदी शिवानंद वडतीले तर उपाध्यक्ष पदी बाळकृष्ण सुरवसे यांची निवड
सोलापूर /न्यूज सिक्सर
बुरुड समाज श्री मेसाई सद्भक्त मंडळाच्या अध्यक्षपदी शिवानंद वडतीले तर सचिवपदी बाळकृष्ण सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे
सोलापूर समाज कल्याण केंद्र, रंगभवन येथे नुकतीच मंडळाची सर्वसाधारण सभा आयोजित
केलेली होती. सदर मिटींगच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष विकास अप्पा सावंत व प्रमुख
उपस्थिती सोलापूर शहर बुरूड समाजाचे अध्यक्ष दशरथजी वडतीले (पत्रकार) यांच्यासमवेत मिटींग
आयोजित करण्यात आली. प्रथमता सर्व पदाधिकारी यांच्यासमवेत श्री ची पूजा करण्यात आली. तद्नंतर
मंडळाचे सल्लागार दशरथजी वडतीले यांनी प्रस्ताविक केले. नंतर मंडळाचे ट्रस्टी सचिव अरूण
सांळुके यांनी आजपर्यंतच्या कामाच्या कार्याचा आढावा मांडण्यात आले. तसेच मंडळाचे ट्रस्टी खजिनदार पेंडित वडतीले यांनी मागील वर्षाचा जमाखर्च ऑडीट अहवाल वाचून दाखविला. त्यास सर्व समाज
बंधवांनी हात वर करून मान्यता देण्यात आली.
तसेच पुढील पाच वर्षाकरिता नवीन ट्रस्टी पदाधिकारी निवड करण्यात आली पुढीलप्रमाणे
अध्यक्ष शिवानंद गंगाराम वडतीले उपाध्यक्ष मनोज सुनिल वडतीले (RK) उपाध्यक्ष अभिजीत अर्जुन
वडतीले सचिव : बाळकृष्ण राजु सुरवसे खजिनदार कमलेश सुनिल वडतीले सदस्य सुरेश किसन
वडतीले, विजय कृष्णात वडतीले धनंजय प्रभुदेव उप्पीन, रोहित देविदास कुकडे, दिपक सतीश रोहिटे, गणेश
निवृत्ती सुरवसे, सल्लागार विकास पोपटराव सावंत, रमेश अंबादास शेंद्रे, पंडित नारायण वडतीले, अरूण
शिवशंकर साळुंके यांची निवड करण्यात आली