श्रेयश पेट्रोलियम मुळेगाव तांडा सोलापूर हैद्राबाद रोड वरती भारत पेट्रोलियमद्वारे चार्जिंग कॉरिडोरची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहनासाठी पहिले चार्जिंग स्टेशन

श्रेयश पेट्रोलियम मुळेगाव तांडा सोलापूर हैद्राबाद रोड वरती भारत पेट्रोलियमद्वारे चार्जिंग कॉरिडोरची सुरुवात
सोलापूर जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहनासाठी पहिले चार्जिंग स्टेशन
सोलापूर /न्यूज सिक्सर
श्रेयश पेट्रोलियम मुळेगाव तांडा हैद्राबाद रोड भारत पेट्रोलियम द्वारे चार्जिंग कॉरिडोर ची स्थापना आज दि 16 रोजी करण्यात आली आहे 30 किलो वॅटचे चार्जिंग स्टेशन कार साठी या 6 कॉरिडॉरमध्ये आहेत, त्यात 24
स्टेशनचे समावेश आहे.
तसेच बीपीसीएलचे 200 नॅशनल हायवे वर असे दर शंभर किलोमीटर ला एक स्टेशन
स्थापित करण्याचे ध्येय आहे.
आज उद्घाटन झालेले कॉरिडोर असे आहेत:
१. पुणे – नगर- औरंगाबाद
२. पुणे – सोलापूर
३. पुणे – नाशिक
४. पुणे – कोल्हापूर
५. मुंबई – नाशिक
६. नाशिक शिर्डी
यामध्ये पुणे-सोलापूर या कॉरिडोर मध्ये श्रेयश पेट्रोलियम मुळेगाव तांडा हैद्राबाद रोड सोलापूर येथे भव्य उद्घाटन समारोह संपन्न झाला श्रेयस पेट्रोलियम चे मालक पियुष बालाजी सोनटक्के,सोलापूरचे T.M. अचिंत भावसार व S.O. श्री शाश्वत शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न केले. त्यावेळेस T.E. हर्षित गौड व T.C. राहुल कचरे हे उपस्थित होते.
जे EV कार मध्ये धकधकीने प्रवास करत होते, आपण एका जागेवरून दुसऱ्या
जागेवर कसे पोहोचू या प्रनशनने पीडित होते, इलेक्ट्रिक वेहिकल च्या ग्राहकांची ही
दुविधा लक्षात ठेवून त्यावरती त्यांच्या मनशांतीसाठी निवारण म्हणून या कॉरिडोर ची स्थापना केलेली आहे.
इथून पुढे BPCL पंप वर आपली EV कार चार्ज करून मिळेल व लांब चा प्रवास पार पडू शकेल. आणि आपल्या सोलापूर मध्ये हे EV चार्जिंगचे पहिले स्टेशन श्रेयश पेट्रोलियम येथे आजपासून ग्राहकांसाठी सुरू झाले आहे.