धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेमधील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दि.६ माचे ते दि.१३ मार्च रोजी पर्यंत धाराशिव जिल्हयातील पोलीस ठाणेत दाखल असलेल्या गुन्हातील पाहिजे, फरारी, निष्पन्न आरोपी यांना अटक करण्याची विशेष मोहिम राबविण्यात आली
या मोहिमे दरम्यान धाराशिव जिल्हातील पोलीस ठाणेत दाखल असलेल्या गुन्हयातील ४१पाहिजे आरोपी,१३ निष्पन्न आरोपी , ०१ फरारी आरोपी अशा आरोपीतांना एकुण ५५ गुन्हयात अटक करण्यात आली. तसेच चोरी व घरफोडीचे जिल्हयातील ०३ तसेच सोलापुर जिल्हातील ०२ असे एकुण ०५ गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील लोहारा पोलीस ठाणे गुरनं.५३ /२०२० भादवि कलम ३०२ या खुनाच्या गुन्हयातील आरोपी नामे अर्जुन विलास भोसले, रा. सिंदगाव ता.तुळजापुर जि.धाराशिव हा गुन्हा घडल्यापासुन o३ वर्षे फरार झाला होता त्यास ही पकडण्यात यश आले आहे. त्याचे विरुध्द धाराशिव जिल्हातील विविध पोलीस ठाणेत घरफोडी व जबरी चोरी केल्याचे एकुण १० गुन्हे दाखल असुन त्याचे कडुन इतर घरफोडीचे ०३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
चोरीच्या १२ गुन्हयातील पाहीजे आरोपीस अटक- आरोपी नामे मोहन शिवराम शिंदे रा. घोगा पारधीपिढी इटकुर ता.कळंब जि. धाराशिव यास पवार वाडी शिवारातुन ताब्यात घेतले असुन, त्याचे विरुध्द जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात चोरी व घरफोडीचे ०९ तसेच बिड जिल्यात ०२व उरण, नवीमुंबई येथे ०१ असे एकुण १२ गुन्हे दाखल आहेत.
कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा चे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहा.पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, सहा.पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस उप-निरीक्षक संदिप ओहोळ, पोलीस अंमलदार- वलीउल्ला काझी, जावेद काझी, विनोद जानराव, अमोल निबांळकर, शौकत पठाण, प्रकाश औताडे, प्रदीप वाघमारे, हुसेन सय्यद, फरहान पठाण, नितीन जाधवर, अमोल चव्हाण, अजित कवडे, पांडुरंग सावंत, बबन जाधवर, अशोक ढगारे, बलदेवसिंग ठाकूर, योगेश कोळी, साईनाथ अशमोड, रविंद्र आरशेवाड, मपोअं- शैला टेळे, रंजना होळकर चालक- सुभाष चौरे, महेबुब आरब, धनजय कवडे, पांडुरंग मस्के, दिनेश उंबरे यांचे पथकाने केली आहे.