खा. इम्तियाज जलील याच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने तुळजापूर येथे विद्रोह मोर्चा
खा. इम्तियाज जलील याच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने तुळजापूर येथे विद्रोह मोर्चा

खा. इम्तियाज जलील याच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने तुळजापूर येथे विद्रोह मोर्चा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
खा. इम्तियाज जलील याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड तुळजापूर विभाग यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला
महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतरण करून त्यावर शिक्कामोर्तब केला, असताना सुद्धा छत्रपती संभाजीनगर व धाराशिव या शहरांच्या नावाला विरोध करणाऱ्या व संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे फोटो कार्यक्रमात लावून त्याचे उदातीकरण करणाऱ्या शिवद्रोही महाराष्ट्र द्रोही खा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि.१४ मार्च रोची संभाजी ब्रिगेड तुळजापूर विभाग यांच्या वतीने मोर्चात छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असलेला रथ बरोबर मोर्चा काढण्यात आला विद्रोह मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून ते तुळजाभवानी मंदिर, महाद्वार रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत या मार्गाने विद्रोह मोर्चा काढीत तहसील कार्यालय येथे खा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणादेत खा. इम्तियाज जलील यांच्या प्रतीमेश चप्पलने मारत घोषणा देत तहसिलदार सौदागर तांदळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड , किशोर गंगणे , ब्रिगेडचे प्रदेश संघटक दिनेश जगदाळे, संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष किरण राज घाडगे , विभागीय अध्यक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ राऊत , मराठा मूक मोर्चा राज्य समन्वयक सुनील नागणे , महेश गवळी , जिवण इंगळे ,अर्जुन साळुंखे , अमरराजे कदम,महेश चोपदार , शिवसेनेचे तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी ,धनराज बिराजदार , बालाजी यादव उमरगा , महादेव मगर यांच्या सह हजारो कार्यकर्ते विद्रोह मोर्चा खा. इम्तियाज जलील विरोध सहभागी होते.