मुरूम शहरात होळी सण उत्साहात साजरा

मुरूम शहरात होळी सण उत्साहात साजरा
मुरूम /न्यूज सिक्सर
मुरूम शहर व परिसरात दि.०६ वार सोमवार रोजी होळी सण उत्साहात साजरे करण्यात आले. भारत देशात विविध सण साजरे केले जातात त्यातीलच एक सण म्हणजे होळी, होळी सणा बाबत अनेक धारणा अनेक मान्यता आहेत, हिवाळा संपल्यावर उन्हाळ्याच्या सुरुवातीला होळी साजरी केले जाते, वातवरनात झालेले बदल, शरीराला ऊर्जा मिळावी अशी ही एक धारणा आहे. मुरूम शहरातील महादेव नगर, हनुमान चौक,गांधी चौक,किसान चौक,टिळक चौक,अशोक चौक, नेहरू नगर भागात व त्याचबरोब घरासमोर होळी सण उत्साहात साजरा करण्यात आले. होळी सणानिमित्त ठीक ठिकाणी सुंदर असे रांगोळी काढण्यात आले होते, गवऱ्या,लाकडे यांनी होळीची सजावट करून विधिवत पूजा अर्चना करून होळी पेठवण्यात आली, चलग चँपी नाच,होळी च्या गवऱ्या पाच हे घोषणा देत बोंब मारण्याची प्रथा आहे, पूर्वीच्या होळी सणात आणि आताच्या होळी सणात थोडीफार तफावत मात्र दिसून आले, पूर्वी गवऱ्या रचलेल्या ढिगा, लाकडे चोरी करून आणायचे व त्याच बरोबर घरोघरी जाऊन गवऱ्या मागून आणायचे आणि संध्याकाळी त्याची होळी पेटवायची प्रथा होती आणि त्यात जो आनंद मिळत होता, तो मात्र साजऱ्या होणाऱ्या सणात मिळत नसल्याचे मात्र नक्की दिसून येते. एकंदरीत पिढ्यानपिढ्या चालू असलेले परंपरा मात्र अखंडपणे जोपासण्याचे कार्य मात्र थांबले नसल्याचे दिसून येते, होळी दरम्यान चिमुकल्यामध्ये एक आनंद उत्साह निर्माण होतो, अनेक रंगबेरंगी सण म्हणजे होळी असेही त्याची धारणा आहे, व त्याचबरोबर हिरणकश्यपू राजा जो देवी देवताचे विरोध करायचं त्याच राजाचा मुलगा म्हणजे भक्त प्रल्हाद याला भगवान विष्णूचे जप,समरण करू नको म्हणून होळी रचून त्यावर त्याच्या बहीनाला म्हणजे होलिकाला जिला अग्नी जाळू नये असे वरदान होते, तीच्या मांडीवर भक्त प्रल्हादला बसवून होळी पेटवण्याचे आदेश दिले, त्या होळीत भक्त प्रल्हाद सुखरूप पणे वाचला मात्र होलिका जळून भस्म झाली, तेंव्हा आनंदोउत्सव साजरा केला आणि तेंव्हापासून होळी साजरी केली जाते अशी ही मान्यता आहे. मुरूम शहरात किसान चौकात सर्वात मोठी होळी पेठवण्यात आले होते.