सामाजिक उपक्रमांनी अश्लेष भैय्या मोरे यांचा वाढदिवस साजरा

सामाजिक उपक्रमांनी अश्लेष भैय्या मोरे यांचा वाढदिवस साजरा
उमरगा/न्यूज सिक्सर
भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री अश्लेष भैया मोरे यांचा वाढदिवस ६ मार्च रोजी उमरगा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार श्री ज्ञानराज चौगुले, युवानेते श्री किरण गायकवाड, डॉ. यतिराज बिराजदार, श्री सचिन जाधव आणि भारत शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ, व्यापारी महासंघ, आय एम ए, यमराज गृप, ग्राम पंचायत तलमोड, ग्राम पंचायत माडज, ग्राम पंचायत येळी, आदींनी वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन समाजोपयोगी कामांची सुरुवात आणि शैक्षणिक दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून अश्लेष भैया मोरे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली. वाढदिवसाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने सामाजिक प्रबोधन सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दिनांक ४ मार्च ते ६ मार्च या तीन दिवसांमध्ये साहित्य, समाजकारण व राजकारण या विषयांचा समावेश असलेली ऑनलाइन व्याख्यानमाला घेण्यात आली. ज्यामध्ये डॉ. गणेश बेळंबे, लातूर. मा. प्रियंका तमाईचेकर, पुणे आणि डॉ. अनुप्रिया खोब्रागडे, मुंबई या वक्त्यांनी विविध विषयांवर व्याख्यान दिले. मौजे तलमोड येथे गावातील विविध ग्रामविकासाच्या योजनांचा शुभारंभ भैय्या साहेबांच्या हस्ते करण्यात आला. अश्लेष भैय्या यांनी मागील तीन वर्षापासून जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या तीस विद्यार्थ्यांना दत्तक घेवून त्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आहे. याही वर्षी त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये गणवेश व शैक्षणिक साहित्य पुरवठा करण्यात आला. याप्रसंगी आमदार श्री ज्ञानराज चौगुले, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ शकुंतला ताई मोरे, मुख्याध्यापक श्री पद्माकर मोरे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयात शिक्षण घेतलेला विद्यार्थी रोजगाराभिमुख झाला पाहिजे यासाठी वाढदिवसानिमित्त भव्य असा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. त्या रोजगार मेळाव्यास वेगवेगळ्या भागातून अतिशय चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला. या मेळाव्यात १५० बेरोजगार तरुणांनी लाभ घेतला आहे. त्यांची मुलाखत आणि प्रमाणपत्रे पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य म्हणून भैय्या साहेबांची निवड झाली असल्यामुळे मौजे माडज येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावातील विविध विकास कामांसाठी सहकार्य करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
अश्लेष भैया मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी प्राचार्य डॉ जी एच जाधव, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ संजय अस्वले, उपप्राचार्य धनाजी थोरे, उपप्राचार्य प्रा जी एस मोरे, पर्यवेक्षक प्रा. शैलेश महामुनी, डॉ. विनोद देवरकर, डॉ व्यंकट सूर्यवंशी, डॉ ज्ञानोबा ढोबळे, डॉ सन्मुख मुछट्टे, डॉ समाधान पसरकल्ले, डॉ मनोरंजना निर्मळे, डॉ रेश्मा नितनवरे, आदींनी पुढाकार घेतला. तसेच सामाजिक उपक्रमांसाठी अश्लेष भैया मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री विशाल काणेकर, प्रबंधक श्री राजकुमार सोनवणे, अधीक्षक नितीन कोराळे, मल्लिनाथ सुंटनुरे, अनिल साळुंके, विकास घोडके, महेश जाधव, अशोक मंमाळे, विकास कोराळे, संतोष जाधव, नरसिंग लवटे आदींनी पुढाकार घेतला.