अर्चनाताई गंगणे, विनोद गंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप

अर्चनाताई गंगणे, विनोद गंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप
तुळजापूर /न्यूज सिक्सर
नगर परिषद तुळजापूर माजी नगराध्यक्षा अर्चना गंगणे व युवक नेते विनोद गंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त पुजारी मंडळ मंगल कार्यालयात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी उशिरापर्यंत नागरिकांचा रांगा लागल्या होत्या. दिवसभरात शेकडो नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी विनोद गंगणे व माजी नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. पल्लवी रोचकरी, माजी नगराध्यक्षा जयश्री कंदले, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, नरेश अमृतराव, आनंद कंदले, शिवाजी बोधले, मीना सोमाजी आदींची उपस्थिती होती. तपासणी नंतर लगेच चष्मा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे, विजय कंदले, किशोर साठे, सुहास साळुंके, नागेश नाईक, शांताराम पेंदे, रोहित चव्हाण, अभिजित कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मगर यांनी केले. माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी व रुग्णकल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.