लोहारा शहरात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा 126 वा स्मृती दिन साजरा

लोहारा शहरात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा 126 वा स्मृती दिन साजरा
लोहारा /न्यूज सिक्सर
लोहारा शहरातील शिवनगर येथे सावित्रीबाई फुले सखी मंच व महात्मा फुले युवा मंच यांच्यावतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा 126 वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ.वैशालीताई अभिमान खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या सचिव तथा जि.प.माजी सदस्य मिराताई अविनाश माळी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना गटनेत्या सौ.सारिका प्रमोद बंगले, नगरसेविका सौ.सुमन दिपक रोडगे,सोसायटीच्या संचालिका सौ.सुनंदा क्षीरसागर,जिल्हा सहकार बोर्ड संचालक तथा नगरसेवक अविनाश माळी,युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे,माजी नगरसेवक श्रीनिवास माळी,सोसायटीचे व्हाईस चेअरमन राम क्षीरसागर, सुग्रीव क्षिरसागर,सतिश माळी, माजी नगरसेवक हरी लोखंडे, पत्रकार निळकंठ कांबळे,आदि उपस्थित होते. या कार्यक्रमास सुजाता क्षीरसागर,गितांजली क्षीरसागर,महादेवी माळी, भाग्यश्री काटे,अमोल माळी, सुनीता फुलसुंदर,सोनाली काटे, प्रणिता क्षीरसागर,मंगल क्षीरसागर,प्राचार्य शहाजी जाधव, सोमनाथ भोजने,संतोष क्षीरसागर,संतोष माळी,सोमनाथ मुळे, संजय दरेकर,बंटी क्षीरसागर, पार्थ शेवाळे,रोहन खराडे,आर्या फुलसुंदर,वैष्णवी क्षीरसागर, इंद्रजित क्षीरसागर,चंद्रकांत माळी, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शशीकांत माळी यांनी केले तर गहिनीनाथ क्षीरसागर यांनी आभार मानले.*