न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांची जळकोट ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड 

मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांची जळकोट ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

जळकोट/न्यूज सिक्सर

तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
आज दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी जळकोटच्या उपसरपंच निवडीसाठी कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता . निवडणूक प्रक्रिया सरपंच आशोकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . सूचक म्हणून ग्रा. पं. सदस्य प्रा . गजेंद्र कदम यांनी स्वाक्षरी केली .उपसरपंच पदासाठी प्रशांत नवगिरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस . नडगिरे यांनी केली .
यावेळी जि. प . सदस्य प्रकाश चव्हाण, भाजपाचे राष्ट्रीय परिषद सदस्य भिमाशंकर हासुरे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस महेश कदम, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, सोसायटीचे माजी चेअरमन राजकुमार पाटील, व्हाईस चेअरमन नरसिंग हिंडोळे, बबन मोरे, दत्तात्रय चुंगे, बसवराज कवठे, गिरीश नवगिरे, पांडुरंग कदम ,वैभव स्वामी, अजय डांबरे, आकाश पटणे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे, जीवन कुंभार, कल्याणी साखरे, जयश्री भोगे, दिपा कदम, सुरेखा माळगे, राजश्री कागे आदी उपस्थित होते . नवगिरे यांच्या निवडीमुळे पेढे वाटून व फटाक्यांची आतशबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे