
लोहारा / प्रतिनिधी
होळी येथे महिलांच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा
राजे प्रतिष्ठानचा उपक्रम
लोहारा तालुक्यातील होळी येथील राजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुर्ती पुजन व ध्वजारोहण हे सर्व कार्यक्रम महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सरोजा बिराजदार, सुनंदाताई मोरे, ग्रामपंचायत सदस्या रेखा बाबळसुरे, महिला बचत गटाच्या दैवता सरवदे, सुषमा मडोळे, कांबळे, शकुंतला मोरे, देवयानी गायकवाड, प्रभावती माने, अंगणवाडी कार्यकर्त्या शशिकला गायकवाड, रागिणी जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप मोरे, करण बाबळसुरे, शंकर मोरे ,अभिषक जाधव , ग्रामपंचायत सदस्य केशव सरवदे, माजी संरपच व्यंकट माळी, महेश जाधव ,अर्जुन बाबळसुरे चंद्रकांत माळी , प्रदिप जाधव,रवी लोहार,सौरभ मोरे ,रणजीत जाधव , मंगेश जाधव , दिगंबर पवार ,प्रदिप लोहार, नितिन जाधव,पवन मोरे , परमेश्वर भोसले ,अमोल बिराजदार अतुल मोरे, पो.कॉ.भोपळे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव सरवदे यांनी तर आभार प्रदर्शन करण बाबळसुरे यांनी केले.