
लोहारा / प्रतिनिधी
ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा शाखा लोहारा येथे महाशिवरात्री निमित्त शिवअवतरण, शिवध्वजारोहान लोहारा तहसीलदार संतोष रूईकर यांच्या हस्ते करण्यात आले.
काळ फार थोडा राहीला आहे प्रत्येकांने आपले अहंकार त्यागुन एका परमात्माची आठवण केली पाहिजे सर्वजाती धर्माचा एकच ईश्वर आहे ज्योती बिंदु त्या ईश्वराचा आठवणीत राहा असे मत मुरुम सेवा केंद्राचे ब्रह्माकुमार राजयोगी राजूभाईजी यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच लोहारा सेवा केंद्राचे संचालिका ब्रह्माकुमारी सरिता बहेनजी यांनी तन मन धनाने ईश्वराची सेवा कशा प्रकारे करता येते आणि मेडीटेशन करण्याचे फायदे सांगितले.
मनातील अध्यात्म बदलचा संग्राम नीरस झाला काहीतरी वेगळं अनुभवायलाला मिळाल यांचा खुप आनंद झाला असल्याचे तहसिलदार संतोष रूईकर यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमासाठी बीके राजयोगी,राजूभाईजी,बीके सरिता बहेनजी,बीके लक्ष्मी बहेन,कुमारी,ऐश्वर्या,पुनम,नगरसेविका शामल माळी,डॉ. रूपाली श्रीगिरे, डॉ.माकणे,शिवम श्रीगिरे,निलकंठ पाटिल, पेशकार जाधव,बीके सुधाकर साळूके, राजू सूर्यवंशी,शिवानंद माशाळकर,विश्वनाथ माशाळकर,दिलीप पाटील,राजू लामजाने,शेषराव गोरे, दिलीप भाई (मुरूम) स्वामी भाई (मुरूम) आदी मोठया संख्याने उपस्थित होते.