ब्रेकिंगमहाराष्ट्र
महिलांनी अन्याय,अत्याचार याबाबत व्यक्त होणे आवश्यक आहे–प्रज्ञाताई गायकवाड

महिलांनी अन्याय,अत्याचार याबाबत व्यक्त होणे आवश्यक आहे–प्रज्ञाताई गायकवाड
तुळजापूर /न्यूज सिक्सर
महिलांनी आपल्यावर होणारे अन्याय, आणि अत्याचार याच्या विरोधात लढण्यासाठी आई भवानी या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शक्ती देत आहे सर्व महिलांनी सक्षम होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते प्रज्ञाताई गायकवाड यांनी महिला भगिनींना केले आहे.
तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोड येथील पालावरच्या महिलांना जागतिक महिला दिना निमित्त साड्या वाटप करण्यात आल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रज्ञाताई गायकवाड , चर्मकार संघाचे गणेश राजगुरू, पत्रकार सोमनाथ बनसोडे , राहुल कोळी, तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी तसेच पालावरच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.