जागतिक महिला दिनानिमित्त वागदरीत पत्रकार संघाच्या वतीने महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त वागदरीत पत्रकार संघाच्या वतीने महिलांचा सत्कार
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त वागदरी येते विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा यथोचित सत्कार करून त्याना सन्मानित करण्यात आले
येथील जि.प.प्राथमिक शाळा वागदरी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच मिनाक्षी महादेव बिराजदार व मुख्याध्यापिका महादेवी जत्ते आदी होत्या.
प्रारंभी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते पुजन करून सरपंच तेजाबाई मिटकर, उपसरपंच मिनाक्षी बिराजदार,ग्रा.प.सदस्या सुरेखा यादव, मुक्ताबाई बिराजदार,मुख्याध्यापिका महादेवी जत्ते, सहशिक्षका रेखा साखरे, मनिषा चौधरी, माजी उपसरपंच कविता गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती च्या उपाध्यक्षा विजयाबाई वाघमारे, उमेदच्या सिआरपी विद्याताई बिराजदार, क्रषी सखी कोमल झेंडारे,जेष्ठ महिला कार्यकर्त्या शिलाबाई बिराजदार,नूरजहाँ शेख,आदींचा पेढा भरवून पुष्पगुच्छ देवून शालेय विद्यार्थीनीच्या हस्ते यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विज्ञान अंतरिक्ष केंद्र सहल उपक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेत गुणानूक्रमे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सेवा निव्रत्त मुख्याध्यापक शिवाजी मिटकर गुरुजी यांचे मार्गदर्शन पर भाषण झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका प्रमुख सल्लागार तथा रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक दिनकर वनवे यांनी केले.
यावेळी ग्रा.प.सदस्य तथा माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष तथा भाजपा मेडिया सेलचे तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ, माजी सरपंच दत्ता सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सोमवंशी,बाळू पवार सह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.