तुळजापूर- तालुक्यातील वडगाव (लाख )येथे किरणा दुकान जळनखाक;९० हजाराचे नुकसान आरोपी फरार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर- तालुक्यातील वडगाव (लाख )येथे
किरणा दुकान जळनखाक;९० हजाराचे नुकसान आरोपी फरार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (लाख ) येथील श्रीमंत संभाजी करंडे व त्यांची पत्नी वय ७० वर्ष यांचे किराणा दुकान जळुन घाक होवून जवळपास ९० हजाराचे नुकसान केल ही घटना दि. १० मे रोजी तीन वाजण्याच्या सुमारास घडले.
वडगाव लाख येथे करंडे यांचे किराणा दुकान राहुल करंडे याने दारूच्या नशेत आजा आजीला शिवीगाळ करत जीवे मारतो म्हणत दुकान पेटवून दिले दुकानात जवळपास किरणामाल तसेच फ्रिज सह इतर साहित्य ९० हजाराचा जळून खाक झाला.
या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळतात पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असता पोलिसांना बघून राहुल करंडे घटनास्थळावरून पसार झाला.
पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या आदेशावरून श्रीमंत संभाजी करंडे यांच्या फिर्यादीवरू कलम ४३६ ,५०४ राहुल करंडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण पवार ते करीत आहेत.