
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा पोलीस ठाण्यात एप्रिल महिन्यात येणाऱ्या सर्व धार्मिक सण उत्सव जयंती संदर्भात पोलिस पाटील,जयंती उत्सव समिती पदाधिकारी समवेत बैठक दि.१० रोजी पार पडली.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुरू आहे.सर्व नियम व अटी याच्या आधीन राहून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेऊन ईद,सण,जयंती उत्सव शांततेने आनंदाने साजरी करावे.सामाजिक व आर्थिक विकासासाठी शांतता,सामाजिक सलोखा व अत्यंत महत्त्वाचा आहे.रमजान ईद,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,रामनवमी,हनुमान जयंती साजरे करताना पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन लोहारा पोलीस ठाणे निरीक्षक अजित कुमार चिंतले यांनी केले आहे.
यावेळी विविध कार्यक्रमाची रूपरेषा/कार्यक्रमा बद्दल तालुक्यातील उपस्थित उत्सव समिती अध्यक्ष पदाधिकारी यांच्याकडून माहिती घेण्यात आली. उत्सव मिरवणुकीत पारंपारिक वाद्याचा वापर करावा असे सांगण्यात आले.
यावेळी लोहारा तालुक्यातील सर्व गावातील पोलीस पाटील,जयंती उत्सव समिती पदाधिकारी उपस्थित होते.
