
धाराशिव / प्रतिनिधी
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.के.एम. प्रसन्ना हे धाराशिव जिल्हयातील पोलीस दलाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी, दिनांक ०३/०३/२०२३ रोजी आले असता जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मोकळे पणाने उत्तरे देवून त्यांच्या शंकेचे निरासण केले. जिल्हयात घरफोडी, वाहनचोरी, मोबाईल फोन चोरीच्या गुन्हयातील मुद्देमाल मोठयाप्रमाणात हस्तगत करून तक्रारदार यांना परत देण्यात आला आहे.
सायबर शाखा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असून, प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर सायबर शाखेत तश अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांनी सांगितले आहे. यावेळी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच जिल्हा अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व इतर पोलीस अधीकारी उपस्थितीत होते.