राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयत्ती निमीत्ताने हंगरंगा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयत्ती निमीत्ताने हंगरंगा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न
नळदुर्ग/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील मौजे हंगरगा नळ येथील शिव प्रतिष्ठाण शिवजन्मोत्सव समीतीच्या वत्तीने राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी अखंड हिन्दूस्थानाचे आरध्य दैवत कुळवाडी भुषण राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन तरुणाचे हुदय सम्राट माजी जि.प.सदस्य गणेशदादा सोनटके ,उपसरपंच बंकट बेडगे सामाजीक कार्यकर्ते संजय माने पत्रकार अरुण लोखंडे, यांच्या हस्ते पुजन करूण आरती करण्यात आली त्यानंतर सोलापूर येथून आलेले सोलापूर ब्लड ग्रूप च्या टीमचे स्वागतपर सत्कार करून रक्तदान शिबीराचे उदघाटन गणेशदादा सोनटके यांच्या हस्ते करून शिबीरास सुरुवात करण्यात आली
या रक्तदान शिबीरामध्ये हंगरगा आणि परिसरातील गावामधून आलेल्या ५१ बहादर शिवभक्तानी रक्तदान करून महाराजाना अभिवादन केले. ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्याना मंडळाच्या वतीने हेलमेट वाटप करण्यात आले.
या प्रसंगी जळकोट विविध कार्यकारी सोसायटीचे नुतन संचालक नागनाथ उर्फ अप्पू किलजे सुरेश राठोड जेष्ठ शिवसैनिक सुनिल राजमाने शिवाजी खारे प्रविण चौगुले सुजीत खारे मंडळाचे अध्यक्ष शंकर सुतार उपाध्यक्ष चेतन जाधव सचिव वैभव केदार सिंदकी पटेल विश्वजीत जाधव राम जाधव पंकज पाटील महेश चव्हाण एकनाथ चव्हाण दिनेश चव्हाण सह गावातील शिव भक्त मोठ्या संख्यने या कार्यक्रमास उपस्थित होते.