
लोहारा / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने लोहारा पोलिस ठाण्याच्या वतीने रुट मार्च घेण्यात आला.
दि.१८ फेब्रुवारी रोजी लोहारा शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव संदर्भाने दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. तसेच पोलीस ठाणे येथुन मेन रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक,जगदंबा मंदिर,छत्रपती शिवाजी चौक,बस स्थानक चौक असा रूट मार्च घेण्यात आला.पोलीस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक पोलिस निरीक्षक आर आर पवार,उपनिरीक्षक सुरेश नरवडे यांच्या नेतृत्वाखाली सदर रूट मार्च वेळी २० पोलीस अंमलदार १७ होमगार्ड हजर होते.