
लोहारा / प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारून महाराष्ट्र घडवला.ज्या राजाने संपूर्ण आयुष्य जनतेसाठी रयतेसाठी वाहले,हिंदवी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन स्वराज्य निर्माण केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ वी जयंती लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुर्ती ची पुजा व पुष्पहार हार अर्पण करून साजरी करण्यात आली.
शिवजयंती निमित्त लोहारा परिसरातील शिवभक्तांनी बैलगाडी,चारचाकी, दुचाकी रॅली काढली.
यावेळी सरपंच नागन्ना वकील, चंद्रकांत पाटील,शंकर अण्णा जट्टे,दत्तात्रय बिराजदार,पोलीस निरीक्षक अजित चिंतले,नगराध्यक्ष वैशाली खराडे,उपनगराध्यक्ष आयुब शेख,शिवसेना गटनेत्या सारिका बंगले,नगरसेविका आरती गिरी,उत्सव समिती अध्यक्ष प्रशांत काळे,उपाध्यक्ष अमीन सुबेकर,हाजी बाबा शेख,अमोल बिराजदार, श्रीकांत भरारे,अविनाश माळी,विजय ढगे,जालिंदर कोकणे,विठ्ठल पाटील,अभिमान खराडे,बाळासाहेब कोरे,बाळासाहेब पाटील,सतीश गिरी,प्रमोद बंगले,इकबाल मुल्ला,चेतन बोडगे, प्रकाश बोडगे,माणिक कदम,गौस मोमीन,बाबुराव पवार,डॉ. कुंदन माकणे,हरी लोखंडे,शाम नारायणकर,दिपक रोडगे,आयुब शेख,विक्रांत संगशेट्टी,इस्माईल मुल्लाजी,सलीम शेख,मल्लिनाथ घोंगडे,श्रीनिवास माळी,वैजीनाथ जट्टे,शरद पवार,मेहबूब गवंडी,केडी पाटील,अंकुश बंडगर,प्रकाश भगत,कुलदीप गोरे,सचिन जाधव,दत्ता वाघ,सुनील ठेले,प्रकाश भगत,उमेश देवकर,ओम कोरे,जब्बार मुल्ला,सुकाजी सातपुते,रमेश वाघुले, शहाजी जाधव,लक्ष्मण रसाळ,उत्सव समितीचे महेश गोरे,प्रवीण कदम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलने वेधले सर्वांचे लक्ष….
शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थ्यांनी पोवाडा,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संगीत नाट्य सादर केले.यावेळी प्राचार्य शाहजी जाधव,सविता जाधव रमेश वाघुले,व्यंकटेश पोतदार उपस्थित.
जब्बार मुल्ला यांच्या कडून ऊसाचा रस वाटप
शहरातील हॉटेल व्यवसायिक जब्बार मुल्ला यांनी शिवजयंती निमित्त ऊसाचा रस वाटप केले.