
लोहारा / प्रतिनिधी
४ दिवस क्रीडा, सांस्कृतिक सह विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा शहरातील ग्रामदैवत श्री. महादेवाच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला आज शनिवार दि.१८ पासून सुरुवात झाली.
आज पहिल्या दिवशी महादेवाची मानाची पालखी, व काटीची पारंपरिक वाद्याच्या कडकडाटात व हरिहर भजनी मंडळाचे वारकरी, व शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत जगदंबा मंदिर येथुन मिरवणूकिला सुरुवात झाली.टाळ मृदुंग च्या जयघोषात व हलघी व पारंपरिक वाद्याच्या कडकडाटात फटाक्यांची आतिशबाजी करत मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे निघाली आहे.सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकीचे आगमन होताच महादेवाची आरती होईल, त्यानंतर ही पालखी मिरवणूकीचे जुन्या गावातील प्राचीन महादेव मंदिराकडे प्रस्थान होईल.
या मिरवणुकीत बाल वारकरी च्या दिंडी ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.