
लोहारा / प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (ठाकरे गट) धक्का दिला. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावावर आज (दि.१७) निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबान चिन्हं आणि शिवसेना नाव देण्यात आले आहे.
त्यानिमित्ताने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
यावेळी युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे,मा. नगरसेवक बाळासाहेब कोरे,अभिमान खराडे,नगरसेवक अविनाश माळी,गौस मोमीन, नगरसेवक अमीन सुबेकर,प्रमोद बंगले, मल्लिनाथ घोंगडे,ओम कोरे,दिपक रोडगे,प्रशांत थोरात,सुकाजी सातपुते,रोहन खराडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.