न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आवर नेस्ट बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कै.प्रकाश घोडके गुरुजी यांच्या स्मरणार्थ अणदूर येथे करियर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

आवर नेस्ट बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कै.प्रकाश घोडके गुरुजी यांच्या स्मरणार्थ अणदूर येथे करियर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

अणदूर /न्यूज सिक्सर

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व आदर्श राज्यकर्त्या राजमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त आवर नेस्ट बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कै.प्रकाश घोडके गुरुजी यांच्या स्मरणार्थ अणदूर पंचकृशितील विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी राष्ट्रभक्ती पर गीत घेऊन मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राजकुमार गाढवे यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्य मंत्री मा.श्री.मधुकररावजी चव्हाण साहेब तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अणदूर चे सरपंच मा.श्री.रामचंद्र (दादा) आलुरे हे उपस्थित होते. दरम्यान आयोजकांकडून मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना संबोधन करताना नोकरी व्यवसायासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तुळजापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संबोधन केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविदयालय,सोलापूर चे प्रा.डॉ.प्रदीप जगताप सर यांनी तलाठी भरती, पोलीस भरती, आरोग्य भरती पासून ते एमपीएससी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी नेमका अभ्यास कसा करायचा हे सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले. नळदुर्ग पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सिद्धेशवरजी गोरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व परिश्रम या चतू:र्सूत्रीचा मूलमंत्र दिला. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांना विविध प्रश्नांचा घेराव टाकत दिलखुलास उत्तराने स्वतःतील न्यूनगंड व अभ्यासातील समस्यांचे निरसन करून घेतले.

धाराशिव जिल्ह्यामध्ये अणदूर हे उच्च शिक्षणाचे केंद्रच आहे. कार्यक्रमासाठी श्री. धनराजजी मुळे, श्री.दिपकजी घोडके, श्री, शिवाजी कांबळे,श्री. देविदास घोडके, आदी. मान्यवरांसह पत्रकार बंधू तसेच जवाहर उच्च माध्यमिक विद्यालय,अणदूर, श्री. श्री. रविशंकर विद्यामंदिर अणदूर, बालाघाट कॉलेज नळदुर्ग सह अणदूर, धनगरवाडी, जळकोट, इटकळ, शहापूर, इश्र्वरवाडी, सराटी इ. पंचकृशितील जवळपास ६०० पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

गेल्या ८ वर्षा पासून संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात विविध कार्यक्रम उपक्रम राबविले गेले आहेत आणि पुढेही चालूच असतील असे श्री प्रशांतजी पोतदार व संस्थेच्या पदाधिकऱ्यांनी सांगितले. श्री. प्रवीण प्रकाश घोडके यांनी पुढील काही दिवसांतच हुतात्मा स्मारक येथे अणदूर पंचकृशितील होतकरू विद्यार्थ्यांसाठी कै.प्रकाश घोडके गुरुजी यांच्या स्मरणार्थ अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करण्याचे सांगितले आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भैरवनाथ कानडे यांनी केले तर प्रियंका प्रवीण घोडके यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आकाश घोडके, अंकुर घोडके, राहुल घोडके, महेश घोडके, अंकुश चीनकारे,उमेश लांडगे, रोहित दुधाळकर, महादेव घोडके, बालाजी लांडगे, रिजवान शेख. या तरुणांनी खूप प्रयत्न केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे