न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

विजयाचे रुपांतर विकासात करणार-नुतन उपसरपंच सुनिता पावशेरे

विजयाचे रुपांतर विकासात करणार-नुतन उपसरपंच सुनिता पावशेरे

कलदेव लिंबाळा /न्यूज सिक्सर
कलदेव निंबाळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा पॅनल प्रमुख सुनिता देविदास पावशेरे यांची बिनविरोध निवड झाली.सरपंच महादेव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दि10 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक अध्याशी अधिकारी म्हणून आर.आर. गायकवाड , आणि सचिव म्हणून ग्रामसेवक सुनिल पांचाळ,तलाठी गायकवाड यांनी काम पाहिले.जनतेने टाकलेल्या विश्वासाला अजिबात तडा न जावू देता मंजूर असलेल्या पाणी पुरवठा योजना,साठवण तलाव आदी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे निवडी नंतर सुनिता पावशेरे यांनी मनोगतात सांगितले. ‌यंदाच्या कलदेव निंबाळा ग्रामपंचायत निवडणूकीत माजी सरपंच सुनिता पावशेरे या आदर्श गाव परिवर्तन पॅनल प्रमुख व निवडणुकीत उमेदवारही होत्या. सौ.पावशेरे यांनी मागील पाच वर्षांत प्रथम लोकनियुक्त सरपंच असताना गावचा केलेला सर्वांगिण विकास,मिळविलेले अनेक पुरस्कार,राबविलेले विविध उपक्रम,महिलांची मोठी चळवळ, जनमानसातील निर्माण केलेले स्थान, समतावादी भूमिका शेतकरी, कर्मचारी , सामान्य लोकांचा पाठिंबा, सरपंच पदाचा योग्य उमेदवार आदी मुद्यांवर त्या सरस ठरल्याने मोठ्या फरकाने जनतेने विजयश्री त्यांच्याच पॅनलला मिळवून दिला होता. मी पुन्हा एकदा गावच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच सर्व सदस्य व इतर पदाधिकारी यांच्या सहकार्याने गट तट विसरुन विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकार्य केलेल्या सर्व पदाधिकारी, नागरिक, महिला मतदार जाहीर यांचे आभार मानले.
उपसरपंच निवडीनंतर सर्व उपस्थित सदस्य, महिला व प्रमुख कार्यकर्त्यांनी पेढे वाटत जल्लोष करुन सुनिता पावशेरे यांचा तसेच सरपंच महादेव कांबळे सर्व नवनिर्वाचित सदस्य राजोत्तम गायकवाड,गुराप्पा बोकडे,पूजा कांबळे,मीरा पाटील, पल्लवी डोणगावे, रुक्मीणमीबाई भंडे ,सुजाता पाटील, सुरेश बलसुरे तसेच नुतन चेअरमन तुकाराम बिराजदार,व्हाईस चेअरमन बालाजी कारभारी यांचा पावशेरे व कांबळे परीवार तसेच महिलांच्या वतीने सत्कार करून विकासासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रमुख पदाधिकारी, सर्व नवनिर्वाचित सदस्य,पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचलन देविदास पावशेरे तर सरपंच महादेव कांबळे यांनी अध्यक्षीय समारोप करुन सर्वांचे आभार मानले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे