उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न शेकडो रुग्णांची तपासणी करून करण्यात आले औषधोपचार

उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न
शेकडो रुग्णांची तपासणी करून करण्यात आले औषधोपचार
तुळजापूर/न्यूज सिक्सर
सार्वजनिक आरोग्य विभाग. महाराष्ट्र शासन व उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.9 फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय. तुळजापूर येथे सर्वरोग निदान आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले, यामध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांच्या तपासणी व औषधोपचार करण्यात आला, सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात 500 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात आला,तसेच 17 रक्तदात्यांनी रक्तदान केले,
शिबीराचे उदघाटन श्री. तुळजाभवानीच्या प्रतिमेचे व आरोग्य देवता धन्वंतरी चे पुजन करून करण्यात आले यावेळी रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद(दादा) कंदले, वैद्यकीय अधिकारी डॉ. मुल्ला सर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.संतोष पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला, यावेळी रुग्णालयाचे सर्व डाॅक्टर, सिस्टर, ब्रदर्स, कर्मचारी व सहकारी उपस्थित होते