
मुरूम (सुधीर पंचगल्ले)
केसरजवळगा, ता. उमरगा येथील पत्रकार जावेद पीरसाहेब इनामदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळेत अनाथ व गरजु मुलांना शैक्षणिक साहित्याचे बुधवारी (ता . ७) रोजी वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडीत जीरोळे होते. या वेळी बाबासाहेब डांगे, सरपंच पुजाताई पटवारी, माजी सरपंच अमोल पटवारी, बापूराव पाटील, लोकेश बिराजदार, भारतसिंग राजपूत, शब्बीर इनामदार, मुख्याध्यापक नबीलाल शेख, शमशोद्दीन इनामदार, हुसेन शेख, शेखर चिंचोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कणमूसे, पापू मामा काशटे, प्रवीण बादोले, शरण कणमूसे, दत्ता घोडके, ढोबळे सर, शैलेंद्र राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. एस. पी. इनामदार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी भोसले तर युसूफ गवंडी यांनी आभार मानले.