
मंगरूळ : – (चांदसाहेब शेख)
आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम काही दिवसात वाजणार असल्याने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री समर्थ महाराज यांच्या दर्शनावेळी लिंगायत समाजाचे कार्यकुशल , सर्वसमावेशक व उत्तुंग व्यक्तिमत्त्व ॲड.सोमनाथ उर्फ सोमेश वैद्य यांनी केले आहे
तब्बल 19 वर्षांपासून महाराष्ट्राच्या मंत्रालयात प्रशासकीय कामकाजात माहिर असलेले आणि विकास कामांचा चौफेर अनुभव असलेल्या भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे स्विय सहाय्यक लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्व सोमनाथ उर्फ ॲड.सोमेश वैद्य हे विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदार संघाच्या रण मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या अनेक चाहत्यांकडून व कार्यकर्त्यांकडुनही तशी आग्रही मागणी होत असल्याने त्यांनी ही विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
सोमनाथ उर्फ ॲड.सोमेश वैद्य हे गेल्या 19 वर्षांपासून मंत्रालय विधानभवनात स्वीय सहायक म्हूणन काम करीत असून त्यांना प्रशासकीय कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. सरकारी कामे व योजना कशी उत्तमपणे व जलदगतीने करून घेण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे.
भोसरीचे पैलवान /डॅशिंग आमदार महेश लांडगे यांचे ते स्वीय सहाय्यक म्हणून सध्या काम पाहत आहेत. सोलापुरातील विविध पक्षातील नाराज लोकांकडून तसेच जनतेतूनही ॲड.सोमेश वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली जात आहे. दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी अनुभवी कार्य कुशल असं नेतृत्व गरजेचे आहे. त्यामुळे वैद्य यांनी या रण मैदानात उतरावे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहू ,अशी भूमिका अनेक जण व्यक्त करत आहेत. त्यामुळे दक्षिणच्या रण मैदानात उभारण्याच्या तयारीत ॲड.सोमेश वैद्य हे असल्याचे दिसून येते.
प्रशासकीय व सामाजिक कामाची बांधिलकी कायम जोपसणारे व्यक्तिमत्व सोमनाथ वैद्य हे उच्चशिक्षित असून त्यानी 2009 साली केसी विधी महाविद्यालय मुंबई विद्यापीठातून विधी शाखेचे शिक्षण पूर्ण केले. ॲड.सोमेश वैद्य यांचा दयानंद महाविद्यालय सोलापूर ते मुंबई येथील केसी विधी महाविद्यालय चर्चगेट शिक्षणप्रवास सर्वसामान्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
कायद्याचे शिक्षण पूर्ण करीत असताना सोमनाथ वैद्य यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष यांचे स्वीय सहायक म्हूणन सन 2006 ते 2009 दरम्यान काम पहिले. तत्कालीन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री प्रा लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंत्रालयीन आस्थापनेवर स्वीय सहायक म्हूणन त्यांनी 5 वर्ष काम केले आहे.
लिंगायत समाजातील अनुभवी आणि धडपड करणारा युवक सोमनाथ वैद्य यांनी सोलापूर जिल्ह्यात अनेक समाजउपयोगी कामे केली असून कोरोना लॉकडाउन काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे.
गेल्या 10 वर्षात स्वतःच्या जन्मगावी स्वनिधी व शासननिधीच्या माध्यमातून त्यांनी गावाचा विकास घडवून आणला. याची दखल गावकरी यांनी घेऊन सोमनाथ वैद्य यांच्या वडिलांना गावातील लोकांनी बिनविरोध सरपंच केले आहे.
विविध देशातील अभ्यास दौऱ्यातून नव्या विकासात्मक संकल्पनाची माहिती
सोमनाथ वैद्य यांनी देशांतर्गत तसेच विविध देशातील अभ्यास दौऱ्यातून त्या त्या ठिकाणच्या विकासाचे वेगवेगळे प्रकल्प, विविध योजना याची माहिती घेतली आहे.दावोस, लंडन, पॅरिस, रोम इटली, दुबई, चीन तसेच अन्य युरोपिय देशाचा दौरा तीन वेळा करून त्यांनी नवीननवीन गोष्टी व कौशल्य अवगत केल्या आहेत. त्याअभ्यास दौऱ्याचा दक्षिण सोलापूर मतदार संघाच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे.
———————————
स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फौंडेशनच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम
———————————–
गेल्या 19 वर्षांपासून मंत्रालय विधानभवन प्रशासकीय पातळीवर सतत लोकांचा संपर्क ठेऊन सोमनाथ वैद्य हे अनेक गरजूना सढळ हाताने स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फौंडेशन च्या माध्यमातून मदत करत आहेत. फाउंडेशन च्या वतीने राज्यभरात अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून पत्रकारांच्या जवळपास 195 पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. रविवार दि.21 जुलै रोजी गुरुपौर्णिमानिमित्त जुळे सोलापूर आणि दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागातील श्री स्वामी मंदिरात भक्तांना 51 हजार बेसन लाडू वाटप करण्यात आले .तसेच 7 हजार छत्री वाटप करण्यात येणार आहे. महिला भगिनींना मदतीचा हात देण्याच्या उद्देशातून 5 हजार बचत गटातील महिलांना पर्स वाटप करण्यात येत आहे.पाच हजार युवकांना टी-शर्ट वाटप करण्यात येणार आहे
————————————-
उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान
———————————–
कार्य कुशल असलेल्या ॲड.सोमेश वैद्य यांच्या कृषी आणि ग्रामविकास कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2023 चा सकाळ सन्मान पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. राजभवनातील सोहळ्यात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ॲड.सोमेश वैद्य यांना सन्मानित केले आहे.