
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनीधी
महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक पाल्यांना शासन सेवेत तात्काळ सामावून घेणे, व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रश्ना बाबत उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पावसाळी अधिवेशनात मागणी केल्या बद्दल उमरगा लोहारा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना यांच्या वतीने दि.20 जुलै 2024 रोजी आ.ज्ञानराज चौगुले यांचा पुष्गुच्छ देऊन सत्कार करुण आभार मानले. यावेळी राजेंद्र पाटील (अचलेर), मधुकर बिद्री, सुभाष वाघमोडे, महेश सारणे, मन्मथ स्वामी, बालाजी दंडगुले, देवानंद बनसोडे, यांच्यासह पाल्य उपस्थित होते.