ब्रेकिंग
व्हॉईस ऑफ मिडीयाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी दिनेश सलगरे यांची नियुक्ती

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी दिनेश सलगरे यांची नियुक्ती
मंगरूळ /न्यूज सिक्सर
व्हॉईस ऑफ मिडीयाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी दिनेश सलगरे यांची नियुक्ती. इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे हे गेल्या दहा वर्षापासून ग्रामीण पत्रकार म्हणून काम करतात. आपल्या सकारात्मक लिखाणातून नेहमीच सर्व सामान्यांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. म्हणुन नुकतीच त्यांची व्हॉईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे व व्हॉईस ऑफ मिडियाचे राज्याध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार दिनेश सलगरे यांची व्हॉईस ऑफ मिडीयाच्या तुळजापुर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. व्हॉईस ऑफ मिडियाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी दिनेश सलगरे यांची नियुक्ती झाल्याने गाव परिसरातून अभिनंदन केले जात आहे.