तुळजापूर विधानसभा मतदार संघात ज्येष्ठ, रुग्ण, दिव्यांग घरातून करणार मतदान दि ९ ते १० नोव्हेंबर या दोन दिवसात मतदान होणार आहे.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

तुळजापूर विधानसभा मतदार संघात ज्येष्ठ, रुग्ण, दिव्यांग घरातून करणार मतदान
दि ९ ते १० नोव्हेंबर या दोन दिवसात मतदान होणार आहे.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक हातरुणावर असलेले रुग्ण दिव्यांग बांधव असे एकूण 676 मतदार घरबसल्या करणार मतदान या मध्ये चालता येत नसलेल्या किंवा अंथरुणावर खिळून असलेले ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, दिव्यांगांना आता त्यांच्या घरातूनत मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रच त्यांच्या घरी येणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी केली असून निवडणुकीच्या आचारसंहितेची गोपनीयताबाळगतबीएलओ व अधिकारी फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर पोलीस कर्मचारी यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या समक्षमतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहितीतुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी दि.८ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषद मध्ये बोलत होते.तुळजापूर विधानसभा मतदार संघात दि ९ ते १० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानाची वेळी सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांपर्यंत ज्यांना जाता येत नसेल, अशा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अंथरुणास खिळून असलेल्या रुग्णांसाठी निवडणूक विभागाने घरातूनच मतदान करण्याची सोय केली आहे. त्या मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे म्हणून हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे आव्हान उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी केले आहे. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांची उपस्थित होते.