तुळजापूर तालुक्यात दोन ठिकाणी एमआयडीसीच्या कामांना वेग,
पत्रकार ज्ञानेश्वर गवळ, तुळजापूर

तुळजापूर तालुक्यात दोन ठिकाणी एमआयडीसीच्या कामांना वेग,
12000 तरुणांना मिळणार रोजगार. – आमदार जगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषद मध्ये माहिती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ‘विकासावर बोलू’ या उपक्रमांतर्गत निवडणुकीत सकारात्मक आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात महायुती सरकारद्वारे हाती घेण्यात आलेले मोठे प्रकल्प आणि पूर्वीच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे जे काम सुरू आहे त्याबाबत माहिती दिली जात आहे. त्यानिमित्ताने तुळजापूरचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी ७ नोव्हेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मदतीने तुळजापूर तालुक्यात दोन ठिकाणी एमआयडीसीचे काम चालू झाले आहे. या एमआयडीसीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील अर्थकारणाला चालना मिळणार आहे तसेच दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहे.
तामलवाडी येथे एमआयडीसीसाठी ३७० एकरवर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या भागात उद्योग उभारणीसाठी सोलापूरच्या उद्योजकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासोबतच तुळजापूर तालुक्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील इतर उद्योजकही तामलवाडीत येतील. सोलापूरचे अंदाजे १५० तामलवाडीत येतील. सोलापूरचे अंदाजे १५० युनिट येथे येणे अपेक्षित आहे आणि त्यातून जवळपास १२००० जणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे ३७० एकर आणि होर्टी व मोर्टा येथे २५० एकरवर एमआयडीसी होणार आहे. याठिकाणी येणाऱ्या उद्योगांच्या माध्यमातून १२००० पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. तुळजापूर तालुक्यातील व धाराशिव जिल्ह्यातील तरुण-तरुणींना त्यांच्याच जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती तुळजापूर येथे भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
पुढेबोलतान्हा म्हणाले की,
सोलापूरपासून जवळ असलेल्या तमालवाडी येथे यापूर्वी काही उद्योगांनी आपल्या फॅक्टरीसुरू केलेल्या आहेत. याठिकाणी उद्योगांना मिळणाऱ्या सुविधा आणि अनुदान यामुळे उद्योजक तामलवाडीत येण्यास उत्सुक आहेत.सोलापूरमध्ये राहून देखील उद्योजक आणि तज्ज्ञ लोक तामलवाडी येथे उद्योगासाठी येऊ
शकतात.आतापर्यंत २ बैठका घेतल्या ज्यात अंदाजे १५० उद्योजकांशी संवाद साधला. उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात तामलवाडीत गुंतवणूक करण्यासाठी उत्साह दाखवला.
तामलवाडीमध्ये जशी जागा उपलब्ध होईल तसे ते गुंतवणूक करण्यास तयार आहेत, असा शब्द त्यांनी दिल्याचे राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
तामलवाडी येथे जे प्रकल्प येणार आहेत त्यातील प्रत्येक प्रकल्पात साधारण ७० ते ९० जणांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. बरेच उद्योग हे वस्त्र निर्मितीशी संबंधित असणार आहेत. त्यासोबतच कापडावर प्रक्रिया करण्यासंबंधी उद्योग सुद्धा येथे येणार आहेत.
उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणजेच सीएफसी बाबतची मागणी उद्योजकांकडून करण्यात आली होती, ती देखील मान्य करण्यात आली आहे. सांडपाणी तसेच केमिकलचं पाणी यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सीईटीपी देखील एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासोबतच प्रशिक्षण केंद्र आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत याबाबतची उद्योजकांची मागणी एमआयडीसीने तत्वतः मान्य केली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या प्रक्रियेमध्ये गती येईल, असं देखील पाटील म्हणाले.
होर्टी आणि मोर्टा येथे एमआयडीसीसाठी साधारण २५० एकर भूसंपादन करण्याचा ठरलं आहे. या २५० एकरवर सोलार प्रोजेक्ट आणि त्यासोबतच काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. तुळजापूरनामा न्युज धाराशिव तुळजापूर