राज्यात महायुतीला मतांची आली कडकी अन् बहिण झाली लाडकी मतदारांनो उघडा डोळे बघा नीट
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

राज्यात महायुतीला मतांची आली कडकी अन् बहिण झाली लाडकी
मतदारांनो उघडा डोळे बघा नीट
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा ॲड. कुलदिप उर्फे धिरज पाटील महाविकास आघाडी च्या वतीने निवडणूक लढवित आहेत तालुक्यातून उस्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.
त्या अनुषंगाने प्रचार सुरु असून दि.८ नोव्हेंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथे गावठी साठी गेल्या असता गेले असता येथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी यांचे ॲड धिरज पाटील यांचे स्वागत करुन निवडणूकीत प्रभावी यंत्रणा कार्यरत राहावी. करीता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुलदीप धिरज आप्पासाहेब कदम पाटील यांना आपसिंगा या गावामधील सर्व ग्रामस्थांनी 11000 रूपयांची निवडणूक लढविण्यासाठी मदत केली. ह्या वरुन असे लक्षात येते की, मतदारांना महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदिप धिरज पाटील यांची पसंती आहे.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विद्यमान खासदार ओम राजे निंबाळकर,धीरज पाटील,दिग्विजय पाटील,अमोल जाधव,अमोल कुतवळ, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते