
लोहारा-प्रतिनिधी
विचारांची कास धरून आपले जीवन गोर गरीब दिन दुबळ्या व गरजू लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी घालवले असा बालपणीचा मित्र अचानक देवा घरी गेल्याने त्या मित्राच्या कार्याचा समाजाला काहीतरी उपयोग प्रेरणा मिळावी या उदात हेतूने बाबुराव माळी लिखित डॉक्टर सत्तेश्वर पाटील पुस्तकाचे प्रकाशन सोहळा व डॉ.सत्तेश्वर पाटील मानव विकास केंद्राचे उद्घाटन त्यांच्या स्मृतिदिनी अत्यंत भावनिक वातावरणात करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील जेवळी येथे दिनांक 20 एप्रिल रोजी अंगणवाडी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सिखा संघटित व्हा व संघर्ष करा याप्रमाणे डॉक्टर सत्येश्वर पाटील यांनी आपले बालपण जेवळी या गावात आजोळात शिक्षण घेतले त्यांनी त्यांच्या जीवनप्रवासात मित्रत्वाचे नाते व वैद्यकीय सेवेत माणुसकीचे दर्शन देत निस्वार्थ कार्य केले होते.
मित्राची आठवण सदैव स्मरणात राहावी यासाठी बालमित्र शिक्षक साहित्यिक बाबुराव माळी यांनी आपला सत्येश्वर या पुस्तकाचे लिखाण केले व त्यांच्या स्मृतीपित्यर्थ जेवळी येथे अंगणवाडी सभागृहात 20 एप्रिल रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला.
प्रथमता कार्यक्रमाप्रसंगी दीप प्रज्वलन व आपला सत्येश्वर पुस्तकाचे प्रकाशन व डॉ सत्तेश्वर पाटील मानव विकास केंद्राच्या फलकाचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षापासून विद्या विकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून गरजवंत विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा विडा उचलला जात आहे याच सामाजिक संस्थेला जोड म्हणून जेवळी गावात डॉक्टर सत्तेश्वर पाटील मानव विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सत्येश्वर पाटील यांना ज्ञानार्जन दिलेले गुरु शिक्षक शंकर अरबळे, डॉ.सत्येश्वर पाटील यांची धर्मपत्नी उषा पाटील, साहित्यिक विश्वास धुमाळ,कार्यकारी संचालक रविकांत पाटील,प्रशासकीय प्रमुख अश्विनी हॉस्पिटल सोलापूर डॉ राजेंद्र घुली, डॉक्टर सत्येश्वर पाटील यांची सून, डॉक्टर सुचित्रा पाटील,कन्या प्राजक्ता पाटील, बालमित्र निवृत्त शिक्षक साहित्य बाबुराव माळी, विद्या विकास प्रतिष्ठानचे भारत काळे,महेश क्षीरसागर सह आदीं उपस्थित होते.
डॉ.सत्तेश्वर पाटील यांच्या बालपणीच्या आठवणींना व कार्याला उजाळा देत त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामधील कार्याचा गवगवा आपल्या अध्यक्षीय भाषणात शंकर अरबळे तर मनोगतात रविकांत पाटील,डॉ. सुचित्रा पाटील, आदींनी मांडले.
या कार्यक्रमास जेवळी गावातील डॉक्टर सत्येश्वर पाटील यांच्या बाल मित्रांनी मोठ्या प्रमाणात सहभाग
नोंदवला होता.तर डॉक्टर सत्येश्वर पाटील यांच्या कार्य जीवनावर पुस्तकाचे लिखाण करून मित्रांचे आचार विचार समाजाप्रती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे बालमित्र निवृत्त शिक्षणाधिकारी तथा साहित्यिक बाबुराव माळी यांचा पाटील कुटुंबातर्फे सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी डॉक्टर सत्येश्वर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा वसा डॉक्टर सत्येश्वर पाटील मानव विकास संस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती सामाजिक कार्य सदैव करत रहावे असे मत या प्रसंगी डॉक्टर सत्येश्वर पाटील यांची कन्या प्राजक्ता पाटील यांनी मांडले.
यावेळी साहित्यिक विश्वास धुमाळ यांनी डॉ. सत्येश्वर पाटील यांच्या जीवनातील प्रवासावर शब्दबद्ध केलेली कविता शरणाप्पा कोरे गुरुजी यांनी साद चढवली.
या प्रसंगी मात्र संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक बाबुराव माळी तर सूत्रसंचलन रामकृष्ण पाटील यांनी केले यावेळी मोठ्या संख्येत बालमित्र पाटील कुटुंब तसेच विद्याविकास प्रतिष्ठानचे भारत काळे, महेश क्षीरसागर, सह पदाधिकारी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.