महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ वचननामा पत्रक वाटप
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
उस्मानाबाद(धाराशिव) लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ लोहारा येथे वचननामा पत्रक वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून लोहारा येथील आठवडी बाजाराची ओळख आहे.बाजारानिमित्त येणाऱ्या नागरिकांत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडला.आठवडी बाजारा निमित्त महाविकास आघाडीतील मित्र पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात उतरले.
यावेळी शिवसेना(UBT) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस(SP) तालुकाध्यक्ष नरदेव कदम,काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान,शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, मा.नगरसेवक शाम नारायणकर,मा.सरपंच नवाज सय्यद,इस्माईल मुल्लाजी, मा. ग्रा प सदस्य महेबूब गवंडी,तानाजी घोडके,रघुविर घोडके,काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख प्रकाश होंडराव,राजेंद्र रवळे,सुनील ठेले,निशिकांत गोरे,अभिजित सगट,अभिजित स्वामी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
