श्री श्री गुरुकुल या शाळेतील अर्णव कानडे याला राज्यस्तरीय शिकई मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल

श्री श्री गुरुकुल या शाळेतील अर्णव कानडे याला राज्यस्तरीय शिकई मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल
अणदूर/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेतील अर्णव जितेंद्र कानडे याला राज्यस्तरीय शिकई मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात ३७ किलो खालील वजनी गटात गोल्ड प्राप्त केले आहे तर याच शाळेतील फातिमा अकबर शेख हिने मुलींच्या ३५ किलो खालील वजनी गटात ब्रांझ मेडल पटकाविले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मीरा भाईंदर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत हे मेडल मिळवले आहे.या स्पर्धेसाठी लातूर विभागातुन अर्णव जितेंद्र कानडे,ध्रुवराज धनराज मुळे,रितिक महावीर नाईक,फातिमा अकबर शेख व अर्णा जितेंद्र कानडे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दादाराव घोडके व रामेश्वर सावंत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.अर्णव कानडे व फातिमा शेख यांच्या यशा बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे,सचिव तथा उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार ,संचालिका डॉ रुपाली कानडे ,मुख्याध्यापक लक्ष्मण नरे,मुख्याध्यापक शिवराज भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.