दिवंगत रविंद्र सुरवसे यांच्या निधनाने एक निरपेक्ष भावनेने काम करणारा समाजसेवक हारपला – ग्रामस्थांची श्रद्धांजली

दिवंगत रविंद्र सुरवसे यांच्या निधनाने एक निरपेक्ष भावनेने काम करणारा समाजसेवक हारपला – ग्रामस्थांची श्रद्धांजली
वागदरी/न्यूज सिक्सर
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते,कधीच कुठल्या पदाची अपेक्षा न करता सदैव ज्यांनी समाजसेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण केलं ते सराटी (ता.तुळजापूर) गावच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव म्हणजे रविंद्र सुरवसे त्यांचं नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झालआहे हे अत्यंत जड अंतकरणाने सांगावं लागत आहे. त्यांच्या जाण्याने जे समाजाचं गावाचं आणि कुटुंबीयांचं जे नुकसान झालं आहे ते कधीही भरून न निघणार आहे .चुकीच्या निर्णयाविरुद्ध जाहीरपणे बंड करणारा हा माणूस कुठल्याही परिणामाची भीती न बाळगता चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर म्हणण्याची धमक ज्याच्यामध्ये होती असं हे व्यक्तिमत्व अन्यायाच्या विरुद्ध शेवटपर्यंत झुंजणारा माणूस गावातील प्रत्येक व्यक्तीला अडचणीच्या वेळी आठवणारा हा माणूस आज आपल्यापासून निरोप घेतोय पण यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढणं खूप अवघड आहे अशा भावपूर्ण शब्दात दिवंगत रिविंद्र सुरवसे याना सत्यशोधक प्रतिष्ठान व समस्त सराटीवासीयांतर्फे श्रद्धांजली वहाण्यात आली.