ब्रेकिंग
महायुतीच्या सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ लोहारा येथे घर टू घर प्रचार फेरी
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील शिवसेना – भारतीय जनता पार्टी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – रिपाई – रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये स्थानिक नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ.आरती सतिश गिरी आणि बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी यांनी घर टू घर प्रचार फेरी काढुन पत्रके वाटप केली.
यावेळी भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष सोनालीताई संदीप सातपुते,भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,प्रशांत माळवदकर,शिवा थोरात,दयानंद गिरी मित्र मंडळाचे सदस्य व सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.