जेवळी,माकणी,सास्तुर येथे महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील शिवसेना – भारतीय जनता पार्टी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – रिपाई – रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी उमरगा-लोहारा तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे. माजी मंत्री बसवराज पाटील, माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड, राष्टवादी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा जि.प.चे बांधकाम माजी सभापती अभय चालुक्य, युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड़, युवा नेते शरण पाटील, भाजपा उमरगा लोहारा विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल पाटील, यांनी उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघात ससंयुक्त प्रचारसभा घेत अर्चना पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत. संयुक्त प्रचारसभा घेत असल्याने नागरिकांचा सभेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोहारा तालुक्यातील जेवळी, माकणी, सास्तूर या ठिकाणी शनिवारी सायंकाळी सभा घेण्यात आल्या. माजी मंत्री बसवराज पाटील जेवळी येथील प्रचार सभेत बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तम काम करीत आहेत. ते देशाचं एक कणखर नेतृत्व आहे. जगातिकस्तरावर त्यांना चांगला मान आहे. त्यांच्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. ‘सबका साथ सबका विकास, सबका प्रयास’ हे ब्रीद घेऊन नरेंद्र मोदी काम करीत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी खसदार प्रा.रविंद्र गायकवाड, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा जि.प. बांधकाम माजी सभापती अभय चालुक्य, भाजपा उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील, अदिंनी यावेळी भाषण करून मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमुख म्हणुन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे, दिलीप, भालेराव, शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, सुनिल माने, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, राष्ट्रवादी कॉग्रेस लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल सांळुके, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुर्यवंशी, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, भाजपा लोहारा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरपंच तथा माजी जि.प. सदस्या सौ.शितलताई राहुल पाटील, व्यंकट कोरे, अदि उपस्थित होते. यावेळी आ.ज्ञानराज चौगुले बोलताना म्हणाले कि, मागील 10 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मोठी प्रगती केली आहे. 2047 पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे त्यांचे स्वप्न असुन याकरिता पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम करुण महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना लोकसभेत पाठवावे, असे आवाहन आ.ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थित जनसमुदायास केले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त सर्व महायुतीच्या प्रमुखांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या जाहिर सभेस लोहारा कृ.उ.बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, दिनकरराव जावळे पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष अनिल ओवांडकर, दिलीप पवार, शुभम साठे, प्रदिप पाटील, शिवसेना नेते राजेंद्र माळी, माजी गटनेते अभिमान खराडे, भाजपा उमरगा लोहारा विस्तारक सिद्धेश्वर माने, शिवसेना उमरगा लोहारा विधानसभा प्रमुख शरद पवार, नगरसेवक अविनाश माळी, भोजप्पा कारभारी, उपसरपंच बसवराज कारभारी, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, भाजपा महिला मोर्चा आघाडी जिल्हा सरचिटणीस सौ.सुलोचनाताई वेदपाठक, नगरसेवक दिपक मुळे, नगरसेवक प्रशांत काळे, दत्ता गाडेकर, उपसरपंच बसवराज कारभारी, प्रविण चव्हाण, युवा मोर्चा माजी जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, तालुका उपाध्यक्ष बालासिंग बायस, आयनुद्दीन सवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष अश्पाक सुंबेकर, गोविंद यादव, महेश पोतदार, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.