न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दरोडयाच्या तयारीत असलेले इसमाकडुन एक गावठी कटटा व दोन कत्ती जप्त

Post-गणेश खबोले

धाराशिव -प्रतिनिधी

एका इसमाने त्याचे कब्जात अवैधरित्या पस्त्र बाळगलेले असुन तो परंडा पोलीस ठाणे हददीत येणार असल्याबाबत माहितीनुसार पोलीस अधीक्षक धाराशिव संजय जाधव यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे परंडा प्रभारी दिलीपकुमार पारेकर यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे परंडा येथील सपोनि शंकर सुर्वे, पोलीस हवालदार/१३०३ नितिन गुंडाळे व पोलीस हवालदार/१२९० विशाल खोसे व पोना/१२८० मधुसुदन भीपेमहानुभव यांची एक टिम बनवुन गोपनीय बातमीच्या अनुशंगाने दिनांक १४ रोजी ०३.३० वा च्या सुमारास परंडा ते देवगाव जाणा-या रोडवर दिपक केरवा गरड यांच्या परंडा कात्राबाद रस्त्यालगत असलेल्या शेताजवळ इसम नामे सचिन नवनाथ इतापे रा.लोणी, ता.परंडा, जि. धाराधिव,, तुषार भारत शिंदे, रा.लोणी ता.परंडा जि.धाराशिव,वैभव गोरख कोडलिंगे, रा.शेंद्री ता.बार्शी,जि.सोलापूर, सुजित लक्ष्मण पवार रा.भोत्रा ता.परंडा.जि.धाराशिव,चौतन्य पांडुरंग शेळके रा.भोचा, ता.परंडा, जि.धाराशिव असे परांडा शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र येवुन दरोडयाची तयारी निशी विनापरवाना एक सिल्व्हर रंगाचे गावनी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राउंड,दोन धारदार कत्ती व एक विनानंबर हिरो होंडा कंपनीच्या फॅशन एकस मॉडेलची मोटार सायकल असा एकुण ३८,५००/रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
तसेच चौतन्य पांडुरंग शेळके रा.भोत्रा, ता. परंडा, जि. धाराशिव व सुजित लक्ष्मण पवार रा. भोत्रा, ता. परंडा, जि. धाराशिव यानी उपविभागीय दंडाधिकारी सो, उपविभाग भुम,धाराशिव यांचा हददपार प्रस्तावाचा भंग करून त्यांची अथवा गृह विभाग विषेश महाराष्ट्र शासन यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता मौजे भोत्रा, ता. परंडा, जि. धाराशिव मध्ये प्रवेश करुन वर नमुद आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस हवालदार/१३०३ नितिन प्रकाशराव गुंडाळे यांचे फिर्यादी जबाब वरून गुरनं ७७/ २०२५ कलम ३१०(४),३१० (५) भारतीय न्याय संहितासह कलम ३, ४, २५ शरव अधिनियम सह कलम ५६(अ)/१४२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून सचिन नवनाथ इतापे रा. लोणी, ता. परंडा, जि. धाराषिव,तुषार भारत शिंदे, रा. लोणी, ता परंडा, जि. धाराषिव,सुजित लक्ष्मण पवार रा. भीत्रा ता. परंडा, जि. धाराशिव यांना अटक करून दि १८/०३/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. व आरोपी वैभव गोरख कोडलिंगे, रा.शेंद्री, ता. बार्शी, जि. सोलापूर, व चैतन्य पांडुरंग शेळके रा.भोत्रा, ता. परंडा, जि. धाराशिव हे अंधाराचा फायदा घेवून फरार झाले आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस निरिक्षक परंडा दिलीपकुमार पारेकर, सहा.पोलीस निरिक्षक शंकर सुर्वे, पोलीस हवालदार/नितिन गुंडाळे,विशाल खोसे,मधुसुदन महानुभव, साधु शेवाळे व होमगार्ड दत्ता मेहेर, विजय रोडगे सहभागी झाले होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे