महाबोधी महाविहार व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे-तहसील कार्यालया समोर आंदोलन
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
बुध्दगया येथील महाबोधी महाविहार अतिक्रमण मुक्त करून त्याचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे या मागणीसाठी गुरुवारी (दि.१३) लोहारा तहसिल कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा व सकल बौद्ध समाजाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे श्रध्दास्थान आहे. या महाविहारावर इतर धर्मीयांचे अतिक्रमण आहे. या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना मान्य नसलेले कर्मकांड केले जात आहेत. त्यामुळे बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे महाबोधी महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करावा, या महाविहारचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी (दि.१३) भारतीय बौद्ध महासभा व सकल बौद्ध समाजाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन लोहारा तहसिलदार यांच्यामार्फत बिहार मुख्यमंत्री नितीशकुमार यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भदन्त सुमंगल (कपिल वास्तू,कराळी) यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशिल दिले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष कुमार ढेपे, सरचिटणीस विजय बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते राम गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष तानाजी माटे, ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ गायकवाड, रिपाइं तालुका अध्यक्ष दिगंबर कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे उमरगा तालुका अध्यक्ष अनंतकुमार कांबळे, सरचिटणीस संतोष सुरवसे, मुकेश सोनकांबळे, उमाजी गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आं), दिपक भाऊ निकाळजे ग्रुप यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस दिपक सोनकांबळे, कोषाध्यक्ष विनोद आचार्य, बाळासाहेब खरोसे, गजेंद्र डावरे, मिलींद बनसोडे,प्रितम शिंदे, अमित सुरवसे, रविकिरण बनसोडे, अंकुश भंडारे,अजय सितापुरे, आम्रपाली गोतसुर्वे, रोहीत सिरसाठ, सिता सोनवणे,सुशिला गायकवाड ,वत्सला गायकवाड, मंगल कांबळे, आशा कांबळे,संघर्ष भालेराव, अविनाश कांबळे,सचिन सुरवसे, प्रविण भालेराव, शांताबाई भालेराव,अंजना भालेराव, भारती माटे, जानकाबाई मस्के, संगिता कांबळे,स्वप्निल सोनवणे, किशोर भालेराव, बालाजी माटे, काका भंडारे, परमेश्वर भालेराव,युवराज सुर्यवंशी,केशव जेवळे,दयानंद माने चोखोबा धनेराव, यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.