मुलींनी व्यावसायिक शिक्षण घेवून स्वावलंबी व आत्मनिर्भर बनावे-ऊर्मिला ठाकरे

मुलींनी व्यावसायिक शिक्षण घेवून स्वावलंबी व आत्मनिर्भर बनावे-ऊर्मिला ठाकरे
रोहणा/न्यूज सिक्सर
श्री गुरुदेव इंग्लिश स्कूल, हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रोहणा येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह व बुके देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी वनश्री उर्मिलाताई ठाकरे ढाकरे,केंद्रप्रमुख निर्मला जाधव, विमल इंगळे अंगणवाडी सेविका, तसेच श्रीयोग अर्बन निधीच्या व्यवस्थापकी संचालिका गायत्री डाहाके या सर्व महिलांना गौरण्वित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड अमोल डाहाके हे होते.विशेष उपस्थिती म्हणूनशि.वि.अ वनश्री ऊर्मिला ठाकरे, प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रप्रमुख डॉ.निर्मला जाधव,प्राचार्य अजित डाहाके, वैद्यकीय अधिकारी पिवळटकर मॅडम,सौ.गायत्री डाहाके,संगीता इंगळे मॅडम, खाडे सिस्टर; वर्णा येथील सरपंच सौ स्वातीताई इंगळे ह्या उपस्थित होत्या.सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक सौ.गायत्री डाहाके यांनी केले.पुढे ऊर्मिलाताई ठाकरे मॅडम आपल्या भाषणात म्हणाल्या की,मुलींनी व्यवसायिक शिक्षण घेवून स्वावलंबी व आत्मनिर्भर बनावे,स्त्रीयांचे जीवनमान व राहणीमान या विषयांवर प्रकाश टाकला. तसेच डाॅ निर्मला जाधव,सौ.गायत्री डाहाके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शेवटी ॲड. अमोल डाहाके यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
यावेळी मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी व विद्यार्थिनीची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनींनी सुद्धा भाषणे केली.
सूत्रसंचालन संगीता इंगळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्री.अजित डाहाके यांनी केले
वनश्री ऊर्मिला ठाकरे यांच्या गझलेने महिला दिनाच्या उत्साही व आनंददाई वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली