
शिवन्या बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….
ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता,आणि तुझ्या आजीने तुला तुझ्या वडिलांच्या हातामध्ये दिल होत,जणू तो एक लाख मोलाचा दागिनाच होता,त्यावेळी तू चिमुकल्या डोळ्यांनी आपल्या बाबांकडे पाहत होती.जणू बाबांच्या डोळ्यात एक सहारा, विश्वास, प्रेम, आणि एक सुरक्षित भविष्य शोधत होती..खर म्हणजे सौ.शुभांगी व श्री रमेश अजिनाथ रोकडे यांच्या आयुष्यातील एक सोनेरी पहाटच होती आजचा दिवस खास आहे कारण आज लाडक्या शिवन्याचा वाढदिवस आहे…
शिवन्याला तीच्या बांबानी बघितले तरी मन आनंदाच्या सागराने उचंबळून येते.. तीची एक ‘जादूची झप्पी’ दिवसभरातील सगळी दगदग,ताणतणाव विसरुन जायला लावते… जो कायम हसतमुखाने वडिलांना वेलकम करते.. ज्या इवल्याशा जीवाकडे अनेक अडचणींचे फार सोपे उपाय असतात अशा लाडक्या शिवन्या बाळाचा आज पहिला वाढदिवस…
बाळा आयुष्यभर अशीच हसतमुख आणि आनंदी रहा…
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ….
तुळजापूर तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष तथा दैनिक एकमत तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवळी पत्रकार तुळजापूर.