महिला खेळाडूंसोबत झालेल्या गैरप्रकारचा राष्ट्रवादी महिला आघाडी कडून निषेध

महिला खेळाडूंसोबत झालेल्या गैरप्रकारचा राष्ट्रवादी महिला आघाडी कडून निषेध
उस्मानाबाद /न्यूज सिक्सर
दिल्ली येथे महिला खेळाडू बाबत झालेल्या गैरप्रकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी कडून तोंडावर काळी पट्टी बांधून जाहीर निषेध नोंदवत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंच्या बाबतीत ज्या घटना घडत आहेत त्या घटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अत्यंत विषन्न करणाऱ्या आहेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कायम राज्यातील व देशातील खेळाडूंच्या हितासाठी कार्य करतात
आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळवलेल्या खेळाडूंनी आपली पदके गंगेमध्ये विसर्जित करण्याचा प्रयत्न करणे यामुळे कुस्तीच नाही तर देशातील सर्व खेळाडूंचे मनोबल खच्चीकरण झाल्याचे दिसते
देशभरातील खेळासारख्या क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींचे खेचलेले मनोबल सावरण्यासाठी त्यांच्यासोबत संवाद करणे राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्वाचे वाटते म्हणून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून खेळाडूंसोबत राष्ट्रवादी या अभियानाची सुरुवात करत आहे
दिल्ली येथे खेळाडू हे झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागत असताना ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली ती अत्यंत निंदनीय असून भारतासारख्या देशांमध्ये जिथे मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा वारसा आहे असे असताना महिला खेळाडूंसोबत अशोभनिय वर्तन झाले आहे याचा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला
यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.मनिषा शिवाजी पाटील,शोभा म्हस्के, अनिता गरड,ज्योती माळाळे,सलमा सौदागर, राजनंदिनी जाधव, सुनिता पावशेरे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या